

Thermal lag: why a house stays hot at night, the effect of concrete walls and urban heat islands, and cool roof solutions.
esakal
सूर्य मावळल्यानंतर बाहेरचे वातावरण हळूहळू थंड होऊ लागते, पण आपल्या घरात मात्र असह्य उकाडा आणि उष्णता जाणवत राहते. अनेकदा रात्रीच्या वेळी घरातील भिंतींमधून जणू गरम वाफा बाहेर पडत असल्याचा भास होतो. वैज्ञानिक भाषेत या स्थितीला 'थर्मल लॅग' (Thermal Lag) असे म्हणतात. वैज्ञानिकांनी यामागील नेमकी कारणे आणि घरातील बांधकाम साहित्य उष्णतेशी कसे वागते याचा रंजक उलगडा केला आहे.