Tik Tok अॅप होणार बंद?

वृत्तसंस्था
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

Tik Tok या अॅपचा गैरवापर करण्यात येत असून, या अॅपच्या माध्यमातून अश्लिल मजकूर अपलोड केला जात आहे. त्यामुळे हे अॅप तत्काळ बंद करावे.

- एम. मणिकंदन, माहिती तंत्रज्ञान मंत्री, तमिळनाडू.

नवी दिल्ली : सध्या Tik Tok या अॅपचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. मात्र, आता हे अॅप बंद होण्याची शक्यता आहे. Tik Tok या अॅपचा गैरवापर करण्यात येत असून, या अॅपच्या माध्यमातून अश्लिल मजकूर अपलोड केला जात आहे. त्यामुळे हे अॅप तत्काळ बंद करावे, अशी मागणी तमिळनाडूचे माहिती तंत्रज्ञान मंत्री एम. मणिकंदन यांनी केली आहे. 

तामिळनाडू विधानसभेत बोलताना त्यांनी ही मागणी केली. याबाबत मणिकंदन म्हणाले, Tik Tok अॅपचा वापर अश्लिल मजकूर, व्हिडिओ अपलोड करण्यासाठी केला जात आहे. हे अॅप भारतीय संस्कृतीचा भाग नाही. अपलोड केलेला अश्लिल व्हिडिओ किंवा मजकूर Tik Tok अॅपची निर्मिती करणारी कंपनी ByteDance लाही हा हटविण्यात अपयश आले आहे, असेही एम. मणिकंदन यांनी सांगितले. 

दरम्यान, Tik Tok अॅपच्या माध्यमातून केलेला व्हिडिओ व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवरही युजर्सकडून शेअर केला जात आहे. या अॅपला  मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ, उत्तर प्रदेश, गुजरातसह महाराष्ट्रातही प्रचंड मागणी आहे.  

ब्लू व्हेल गेमवर बंदीची मागणी

दरम्यान, यापूर्वी एम. मणिकंदन यांनी 'ब्लू व्हेल' गेमवर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी आता ही मागणी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will Ban on Tik Tok App