esakal | यवतमाळ जिल्ह्यात पाण्याचे ६५४ स्त्रोत फ्लोराईडयुक्त, तर साडेआठशे पिण्यासाठी अयोग्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
sakal

बोलून बातमी शोधा

654 water sources contained fluoride in yavatmal

जिल्ह्यातील पाण्याचे नमुने दोन टप्प्यात घेण्यात येतात. त्यात मॉन्सूनपूर्व व मॉन्सूननंतर पाणी नमुने घेण्यात येतात. स्त्रोतनुसार वेगवेगळे रंग देण्यात येतात. जिल्ह्यातील बहुतांश स्त्रोतमध्ये फ्लोराईड, नायट्रेट, टर्ब आदींचे प्रमाण आहे.

यवतमाळ जिल्ह्यात पाण्याचे ६५४ स्त्रोत फ्लोराईडयुक्त, तर साडेआठशे पिण्यासाठी अयोग्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

sakal_logo
By
चेतन देशमुख

यवतमाळ : जिल्ह्यातील दहा हजारांपैकी 876 पाण्याचे स्रोत पिण्यायोग्य नाहीत. शिवाय 654 स्रोत हे फ्लोराईडयुक्त असून, त्यात 129 नमुने दीड टक्‍क्‍यांपेक्षा अधिक दूषित आहेत. म्हणून याबाबत गांभीर्याने दखल घेऊन नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी योग्य ते नियोजन करण्याची गरज आहे. 

जिल्ह्यातील पाण्याचे नमुने दोन टप्प्यात घेण्यात येतात. त्यात मॉन्सूनपूर्व व मॉन्सूननंतर पाणी नमुने घेण्यात येतात. स्त्रोतनुसार वेगवेगळे रंग देण्यात येतात. जिल्ह्यातील बहुतांश स्त्रोतमध्ये फ्लोराईड, नायट्रेट, टर्ब आदींचे प्रमाण आहे. त्यात फ्लोराईड व नायट्रेटच्या स्रोतांचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. संबंधित स्त्रोतांवर उपाययोजना केल्या जातात, अन्यथा पिण्याच्या पाण्याचे नियोजन वेगळ्या पद्धतीने करावे लागते. अशात मॉन्सूनपूर्व पाणी नमुने घेण्यात आलेत. जिल्ह्यातील एकूण दहा हजार 689 पाण्याचे स्रोत आहेत. त्यातून पाच हजार 771 स्रोत हे पिण्यायोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे, तर 876 पाण्याचे स्रोत पिण्यायोग्य नाहीत. विशेष म्हणजे त्यामधील 654 स्त्रोतांमध्ये फ्लोराईडचे प्रमाण आढळून आले आहे. तब्बल 129 स्त्रोतांमध्ये दीड टक्‍क्‍यांपेक्षा अधिक फ्लोराईड असल्याने अधिक धोका आहे. त्यात प्रामुख्याने नळयोजना, हातपंप, विहिरी आदी स्त्रोतांमध्ये फ्लोराईडचे प्रमाण असल्याचे आढळून आले आहे. फ्लोराईडचे पाणी पिल्यास विविध आजारांना सामोरे जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. गेल्या काही वर्षांत जिल्हा परिषद प्रशासनाने यावर उपाययोजना करण्याच्यादृष्टीने पावले उचलली आहेत. परंतु, उपाययोजना तोकड्या स्वरूपात असल्याचे दिसून येत आहेत. पाण्याच्या स्त्रोतांमध्ये नायट्रेटचे 245 स्रोत असल्याचे पाणी नमुने तपासणीतून समोर आले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभाग, आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करून नागरिकांना शुद्ध पाणी देणे गरजेचे आहे. 

हेही वाचा - नियतीचा घाला! शेतात मजुरीसाठी मळणीयंत्र घेऊन गेला मालक; मात्र, यंत्रातच कमरेपर्यंत अडकल्याने गेला...


साडेपाच हजार स्रोत पिण्यायोग -
जिल्ह्यातील दहा हजार स्त्रोतांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील केवळ पाच हजार 771 स्रोत पिण्यायोग्य आहेत. उर्वरित स्त्रोतांपैकी 245 स्त्रोतांमध्ये नायट्रेट आहेत, तर 654 स्रोत फ्लोराईडयुक्त आहेत. त्यामुळे या ठिकाणी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे.

पांढरकवडा, घाटंजी सर्वाधिक नायट्रेटचे स्रोत -
जिल्ह्यातील 245 स्त्रोतांमध्ये नायट्रेट आढळून आले आहे. इतर तालुक्‍यांच्या तुलनेत केसापूर व घाटंजी या तालुक्‍यात नायट्रेट असलेल्या जलस्त्रोतांची संख्या अधिक आहे. केसापूर तालुक्‍यात 73 व घाटंजी तालुक्‍यात ही संख्या 40 आहे. वणी 27 व यवतमाळ तालुक्‍यात आठ, बाभूळगाव नऊ, दारव्हा चार, नेर 13, आर्णी 13, पुसद नऊ, दिग्रस दोन, उमरखेड चार, महागाव तीन, राळेगाव आठ, कळंब सात, मारेगाव 11, झरी जामणी 14 आहेत.

हेही वाचा - खासदार साहेबऽऽ हे बरं नव्हं; नवनीत राणा यांनी धावत्या एसटीच्या दारात उभे राहून दिली प्रतिक्रिया

तालुक्‍यानिहाय दीड टक्‍क्‍यांपेक्षा अधिक फ्लोराईडयुक्त पाण्याचे 129 स्रोत -

तालुका फ्लोराईडचे जास्त प्रमाण पाण्याचे स्त्रोत
यवतमाळ २८
बाभूळगाव १२
दारव्हा ०२
नेर १२
आर्णी ०५
राळेगाव ०६
कळंब ०३
केसापूर १९
घाटंजी १४
वणी ०६
मारेगाव ०४
झरी जामणी  १८


संपादन - भाग्यश्री राऊत

loading image
go to top