
AC खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या या 5 गोष्टी, नाहीतर...
Window AC Buying Guide: यंदा महाराष्ट्रासह भारतातील अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा दरवर्षीच्या तुलनेत जास्तच असह्य झाला आहे. या उन्हाळ्यात सीलिंग फॅन तुम्हाला आराम देत नसेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. तुमच्यासाठी नवीन एअर कंडिशनर घेणं आता गरजेचं बनले असेल, तर तुम्ही तुमच्या घरासाठी किंवा ऑफिससाठी योग्य एसी कसा निवडाल? तुम्ही स्वतःसाठी सर्वोत्तम एसी कसा निवडू शकता, हे आज आपण जाणून घेणार आहोत. (5 things to know before buying an AC)
1. Split AC:
हा एसीमध्ये नावाप्रमाणेच दोन युनिट असतात. एक भाग खोलीत आणि दुसरा घराबाहेर दिसतो. ही दोन युनिट पाईप्सने जोडलेली असतात. या प्रकारच्या एसीचा देखभाल आणि स्थापनेचा खर्च देखील जास्त असतो. स्प्लिट एसी हा विंडो एसी पेक्षा महाग असतात, पण ते आवाज कमी करतात. ते कोणत्याही भिंतीवर स्थापित केले जाऊ शकतात. भिंत कमी रुंदीची असली तरीही त्यावर एसी फिट केला जाऊ शकतो.
हेही वाचा: सर्वाधिक मायलेज देणारी स्टायलिश कार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फिचर्स
2. क्षमता-
योग्य एसी मिळविण्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे त्याची क्षमता काय आहे. तुम्हाला तुमच्या खोलीसाठी किती क्षमतेचा एसी हवा आहे हे लक्षात ठेवावे लागेल.
3. टन-
तुम्ही 1 टन एसी (1 Ton AC) किंवा 1.5 टन (1.5 Ton AC) टन क्षमतेचा एसी खरेदी करू शकता. लहान खोल्यांसाठी, तुम्हाला 1 टन AC पुरेसा ठरू शकतो. परंतु तुमची लिव्हिंग रूम, छोटे ऑफिस आणि इतर मोठ्या भागात 1.5 टन एसीची आवश्यकता असू शकते.
4. एनर्जी रेटिंग-
तुमच्या वीज बिलावर एसीचा फरक पडू शकतो. तुम्हाला जर एनर्जी रेटींगबाबत योग्य ज्ञान असेल तर तुम्ही चांगल्या रेटींगचं एसी मॉडेल खरेदी करू शकता, जे तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. उच्च रेटींगचे AC महाग असतात. तुम्ही जेव्हा एसी घ्याल तेव्हा त्यावरील BEE एनर्जी रेटिंग स्टिकर अवश्य शोधा.
प्रत्येक AC ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीद्वारे 5-स्टार स्केलसह येतात. तुमचा एसी किती चांगला आहे हे येथील रेटिंग ठरवते. नेहमी 5-स्टार मॉडेल मिळविण्याचा प्रयत्न करा.
हेही वाचा: कमी किमतीत जास्त मायलेज देणाऱ्या SUV
5. इन्व्हर्टर एसी (Inverter AC) आणि नॉन-इन्व्हर्टर एसी (Non Inverter AC)-
जेव्हा एअर कंडिशनर्सचा विचार केला जातो, तेव्हा तुम्हाला इन्व्हर्टर एसी आणि नॉन-इन्व्हर्टर एसी दोन्ही मिळू शकतात. नॉन-इन्व्हर्टर एसीमध्ये कंप्रेसर स्थिर वेगाने चालतो. तो चालू किंवा बंद केला जाऊ शकतो. वापरादरम्यान कंप्रेसर चालू होतो आणि जोपर्यंत तुमची खोली आवश्यक तापमानापर्यंत पोहोचल्यावर आपोआप बंद होतो.
इन्व्हर्टर एसी तुमच्या वॉल सॉकेटमधून करंट डीसीमध्ये बदलतात आणि नंतर कॉम्प्रेसरसाठी एसीमध्ये बदलतात. हे डिव्हाईसला उर्जा प्रदान करते. कंप्रेसरचे अधिक नियंत्रित कार्य सक्षम करणे हा त्याचा उद्देश आहे.
Web Title: Window Ac Buying Guide 5 Things To Know Before Buying An Ac
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..