सर्वाधिक मायलेज देणारी स्टायलिश कार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फिचर्स | Honda City e:HEV | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Honda City e-HEV
सर्वाधिक मायलेज देणारी स्टायलिश कार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फिचर्स | Honda City e:HEV

सर्वाधिक मायलेज देणारी स्टायलिश कार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फिचर्स

Honda City e-HEV: अलीकडच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये चांगलं मायलेज देणाऱ्या कार खरेदी करण्याकडे लोकांचा कल आहे. होण्डाने आज नवीन होण्डा सिटी (Honda City) कार लाँच केली आहे. ही कार नवीन सिटी ई-एचईव्ही हायब्रीड इलेक्ट्रिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली कंपनीची पहिली कार असून ही कार सेडान सेगमेंटमधील सर्वाधिक मायलेज देणारी कार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ही कार भारतीय कार बाजारात चांगली कामगिरी करेल असा कंपनीला विश्वास आहे. तुम्ही 21000 रुपये भरून कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन बुक करू शकता. (Top Mileage Car in India)

हेही वाचा: PHOTO : Honda City Hybrid ची किंमत जाहीर, पाहा जबरदस्त फीचर्स

फिचर्स (Features)-

होण्डा सिटी ई-एचईव्ही तीन ड्रायव्हिंग मोड्ससह येते, EV ड्राइव्ह, हायब्रिड ड्राइव्ह आणि इंजिन ड्राइव्ह. यात अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये देखील आहेत, ज्यात अँटी-ब्रेकिंग सिस्टम (CMBS), क्रूझ कंट्रोल, RDM, लेन कीपिंग असिस्ट सिस्टम (LKAS) आणि ऑटो हाय-बीम यांचा समावेश आहे.

इंजिन (Engine)-

नवीन होण्डा सिटी ई-एचईव्ही मध्ये 1.5-लिटर, चार-सिलेंडर नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन लिथियम-आयन बॅटरी पॅकद्वारे समर्थित इलेक्ट्रिक मोटरशी जोडलेले आहे. कारचे इंजिन 124 bhp पॉवर आणि 253 Nm पीक टॉर्क जनरेट करते, त्यापैकी 127 Nm टॉर्क कारच्या पेट्रोल इंजिनमधून येतो.

हेही वाचा: Honda Cars India:स्वस्तात कार खरेदीची सुवर्णसंधी; ही कंपनी देत आहे बंपर डिस्काउंट

मायलेज (Mileage) -

नवीन Honda City तिच्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक 26.5 kmpl चा मायलेज देते. याशिवाय मारुतीच्या Celerio बद्दल बोलायचे झाले तर ते 26.68kmpl मायलेज देते. परंतु सेलेरियोचा लुक आणि आकाराच्या बाबतीत तुलना करता होण्डा सिटी खूप पुढे आहे. सेलेरियो आकाराने खूपच लहान आहे. नवीन होण्डा सिटीमध्ये अलेक्सा आणि ओके गुगलसह 37 कनेक्ट केलेल्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. Honda 2030 पर्यंत जागतिक स्तरावर 30 EV मॉडेल लॉन्च करण्याची योजना आखत आहे. पुढील 10 वर्षांमध्ये EV स्पेसमध्ये सुमारे USD 40 अब्ज गुंतवणूक करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

किंमत (Price)-

होण्डा सिटी ई: HEV ची किंमत आहे 19.49 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली). कंपनी 3 वर्षांची वॉरंटी देत ​​आहे. यासोबतच कार खरेदी केल्यापासून लिथियम आयन बॅटरीवर 8 वर्षे किंवा 1.6 लाख किमीची वॉरंटी दिली जात आहे.

Web Title: Honda City Ehev Best Mileage Car In India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top