
आपण अनेकदा अशा जागेत अडकतो जेथे इंटरनेट चालत नाही. अशावेळी आपण आपल्या घरच्यांसोबत आपले लोकेशन शेअर करु शकत नाही.
नवी दिल्ली- आपण अनेकदा अशा जागेत अडकतो जेथे इंटरनेट चालत नाही. अशावेळी आपण आपल्या घरच्यांसोबत आपले लोकेशन शेअर करु शकत नाही. अशा परिस्थितीत तुमच्याकडे काही पर्याय आहेत, ज्याचा वापर करुन तुम्ही तुमचे लोकेशन शेअर करु शकता. जाणून घ्या इंटरनेट नसताना लोकशन शेअर करण्याची ट्रिक
फेसबुकने Like बटण हटवलं; पब्लिक पेजच्या डिझाइनमध्ये केला बदल
स्मार्टफोनवर इंटरनेट नसताना यूझर्संनी आपल्या मोबाईलमधील गुगल मॅप ओपण करावं. त्यानंतर यूझर्सला गूगल मॅपवर आपली लोकेशन शोधावी लागेल. यासाठी कॉलोनीचे नाव, आसपासचे लँडमार्क याचे साहाय्य घेऊ शकतात. उदाहरणात यूझर्स पुण्यातील सदाशीव पेठेचा असेल, तर तो गल्ली क्रमांक किंवा ब्लॉक क्रमांक गूगल मॅपवर शोधू शकतो.
त्यानंतर जवळच्या कोणत्या लँडमार्कवर जा, जो गुगल मॅपवर दिसतोय. त्यानंतर त्या जागेवर थोडावेळ टच करा. असं केल्याने त्या जागेवर रेड डॉट दिसेल. त्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील. पहिला डायरेक्शन, दुसरा शेअर आणि तिसरा सेव्हचा.
लोकेशन शेअर करण्यासाठी दुसरा ऑप्शन शेअरवर क्लिक करा. त्यानंतर टेक्स्ट मॅसेजचा पर्याय निवडा. हे लोकेशन तुम्ही कोणासोबतही शेअर करु शकता. याशिवाय तुम्ही गूगल मॅपच्या स्क्रीनवर रेड डॉट आल्यावर त्याच्या खालील डायरेक्शनचा वापर करु शकता. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की, गूगल मॅप त्याच ठिकाणचा मार्ग दाखवेल, जे गूगल मॅपमध्ये पूर्वीपासूनच सेव्ह असेल.
WhatsApp च्या नव्या Policy मुळे आपली Privacy धोक्यात आहे का?
एसएमएसने लोकेशन पाठवा
एसएमएसद्वारे लोकेशन पाठवण्यासाठी आरसीएस सर्विस उपलब्ध आहे. यासाठी आरसीएस म्हणजे रिज कम्यूनिकेशन सर्विसेस आणण्यात आली आहे. याच्या साहाय्याने तुम्ही SMS च्या मदतीने दुसऱ्या यूझरला मल्टीमीडिया कंटेंट शेअरिंगसारखे लोकेशन पाठवू शकता. याच्या साहाय्याने तुम्ही इंटरनेट नसतानाही आपले लोकेशन पाठवू शकता.