सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी चॅलेंजमध्ये पुरुषचं का हरतात?  

women win viral center of gravity challenge why men cant beat the balance challenge
women win viral center of gravity challenge why men cant beat the balance challenge

सोशल मीडियावर कायम नवनवीन गोष्टी ट्रेण्डमध्ये येत असतात. यात अनेकदा काही फोटो, व्हिडीओ किंवा काही चॅलेंजेसदेखील व्हायरल होतात. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हे चॅलेंज तुफान व्हायरल होत आहे. बऱ्याचशा नेटकऱ्यांनी हे चॅलेंज स्वीकारून त्याचे काही व्हिडीओदेखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत व्हायरल झालेल्या या चॅलेंज व्हिडीओमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांनीच हे चॅलेंज जिंकल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे कठीण वाटणारं हे चॅलेंज महिला इतक्या सहज पद्धतीने कसं काय पूर्ण करता हा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी किंवा ते जिंकण्यासाठी महिलांनी कोणतीही शक्कल लढवली नसून त्यामागे वैज्ञानिक कारण आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी या चॅलेंजचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या प्रत्येक व्हिडीओमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला जिंकल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे महिलाच हे चॅलेंज कसं काय जिंकतात हे जाणून घेण्यासाठी अनेक जणांनी गुगल सर्चचा पर्याय निवडला. यामध्ये महिलांनी हे चॅलेंज जिंकण्याचं खरं कारण समोर आलं आहे.

अ‍ॅकॅडमिक जर्नल थ्यॉरेटिकल बायोलॉजी अॅण्ड मेडिकल मॉडलिंगच्या एका सर्वेक्षणामध्ये महिलांची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कमी असल्याचं स्पष्ट झालं आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ही ८ ते १५ टक्के कमी असते. त्यामुळेच महिलांनी हे चॅलेंज पूर्ण करणं शक्य होतं. विशेष म्हणजे त्यांची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कमी असल्यामुळेच त्यांना प्रेग्नंसीच्या काळातदेखील शरीराचा तोल नीट सांभाळता येतो.

नेमकं काय आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी चॅलेंज?

या चॅलेंजमध्ये प्रथम गुडघ्यावर बसावं लागतं. त्यानंतर हळूच हाताचे कोपरे जमिनीवर टेकवले जातात. हाताचे कोपरे जमिनीवर टेकल्यानंतर एक हात मागे घेऊन तो पाठीवर घेतला जातो. त्यानंतर दुसरा हातदेखील याच पद्धतीने मागे घेऊन केवळ गुडघ्यांवर शरीराचा सगळा भार दिला जातो.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com