World Wildlife Day : आता वन्यजीव रक्षणासाठी डिजिटल तंत्राचा होणार वापर; प्राण्यांच्या हालचालींवर राहणार लक्ष

सांगली वन विभागास जिल्हास्तरावरील नियोजन समितीकडून काही निधी मिळाला आहे.
World Wildlife Day Digital Technology
World Wildlife Day Digital Technologyesakal
Summary

वन्यजीवांविषयी (Wildlife) जागृती व्हावी, त्यांचे संरक्षण व संवर्धन व्हावे, म्हणून ३ मार्च दिवस जागतिक वन्यजीव दिवस (World Wildlife Day) म्हणून जगभरात साजरा केला जातो.

शिराळा : सर्वत्र आढळणाऱ्या वन्यजीवांविषयी (Wildlife) जागृती व्हावी, त्यांचे संरक्षण व संवर्धन व्हावे, म्हणून ३ मार्च दिवस जागतिक वन्यजीव दिवस (World Wildlife Day) म्हणून जगभरात साजरा केला जातो. प्रतिवर्षी एक संकल्पना घेऊन दिवस साजरा केला जातो. २०२४ ची संकल्पना, ‘लोक आणि ग्रह यांना एकत्र जोडणे : वन्यजीव संरक्षणामध्ये डिजिटल तंत्र (Digital Technology) नावीन्यपूर्वक वापर करणे’ हे आहे.

या वर्षात ही संकल्पना जगभर जोरकसपणे राबवून डिजिटल तंत्रज्ञानाचा वन्यजीव संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात अवलंबला केला जाईल. सांगली वन विभागास जिल्हास्तरावरील नियोजन समितीकडून काही निधी मिळाला आहे. त्या माध्यमातून डिजिटल तंत्रज्ञानाच्या अनेक नावीन्यपूर्ण यंत्रसामग्रीची खरेदी करण्यात आली आहे. जागतिक वन दिनाच्या थीम डोळ्यांसमोर ठेवून, काळाची गरज ओळखून वन विभागात आधुनिक साधन सामग्रीची खरेदी करण्यात आली आहे. ज्याचा उपयोग वन्य जीवाच्या रक्षणासाठी होणार आहे.

World Wildlife Day Digital Technology
Brain Hemorrhage Symptoms : मेंदूत रक्तस्राव होण्याची कोणती आहेत कारणे? पेशंटवर काय होतो आघात?

थर्मल ड्रोन

लोकवस्तीत आलेल्या प्राण्यांच्या बचावासाठी, जंगलातील घुसखोरी, जंगलातील आगी, जखमी वन्यप्राणी या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रात्रीच्या वेळी ड्रोन उपयोगी पडतो.

थर्मल इमेज फाइंडर

रात्री अथवा दिवसा गवत, उसात किंवा पिकात लपलेल्या वन्य प्राण्यांची हालचाल टिपतो. त्याचे शारीरिक तापमान नोंदवणे, त्याच्यावर नियंत्रण ठेवणे याकामी महत्त्वपूर्ण ठरत आहे.

ट्रॅप कॅमेरा

जंगलातील वन्य प्राण्यांची संख्या नोंदवणे, त्याची भ्रमंती मार्ग नोंदवणे, अधिवासाची खात्री करणे, जखमी वन्य प्राण्यांवर लक्ष ठेवणे, पशुधन हानी करणारी प्राण्यांची खात्री करणे आदी कामात अत्यंत उपयोगी पडते.

World Wildlife Day Digital Technology
वातावरणातील बदलामुळे 'ताप' वाढला, प्रदूषणाचाही मोठा परिणाम; घरोघरी सर्दी, खोकल्याची समस्या

वायरलेस वॉकी-टॉकी

अतिदुर्गम भागात आगीवर नियंत्रण करताना अथवा वन्य प्राणी बचाव पथकात एकत्रित नियोजन करण्यासाठी याचा उपयोग होतो. जखमी प्राणी उपचार व बचाव याबाबत नोंदी ठेवण्यासाठी इंटरनेटद्वारे स्वतंत्र प्रणाली तयार करण्यात आली आहे. वन्य प्राण्याच्या हल्ल्यांमुळे होणारे नुकसान व त्यामुळे तयार होणारा मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी त्वरित नुकसानभरपाई देण्यासाठी ऑनलाईन प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. झालेली नुकसान भरपाई योग्य प्रमाणात व वन विभागाच्या कार्यालयात हेलपाटे न मारता मिळेल, याची काळजी घेण्यात आली आहे.

World Wildlife Day Digital Technology
विषयचं हार्ड! 'त्या' काळात कोल्हापुरात व्हायच्या उंटांच्याही झुंजी, संशोधनातून माहिती समोर; कबुतरांसह बैल, म्हशींचा नाद मात्र कायम

अभयारण्याबाहेरील प्राण्यांवर नियंत्रण राखण्यासाठी व उपाययोजना करण्यासाठी त्यांच्या हालचाली सॉफ्टवेअरमध्ये नोंद करून डिजिटल मॅप तयार करण्यात येत आहेत. राज्यातील वन्यजीव बाबतीतील गुन्हे हे डिजिटल नोंदी करून यातील गुन्हेगारांची यादी तयार करण्यात येत आहे, जेणेकरून याचा वापर करून गुन्ह्याचे प्रमाण कमी करता येईल, असे विविध उपक्रम राज्य स्तरावर राबविण्यात येत आहेत.

World Wildlife Day Digital Technology
E-Bike Battery : 'अशी' काळजी घेतली तरच ई-बाईक बॅटरी टिकेल, अन्यथा..; काय आहेत नेमके गैरसमज?

वन्य जीवांच्या गुन्ह्यांचा तपास वेळेत होण्यासाठी राज्यभर वन्यजीव अवयव तपासणी केंद्राची संख्या वाढवण्यात आली आहे. राज्य वन्यजीव गुन्हे अन्वेषण विभागाकडून पुण्यात लॅब तयार करण्यात येणार आहे. त्याचा लाभ गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातील वन विभागाला होणार आहे.

- अजितकुमार पाटील, मानद वन्यजीव रक्षक, सांगली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com