तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स बनावट तर नाही ना? असं तपासा | Driving License | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Driving License
तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स बनावट तर नाही ना? असं तपासा | Driving License

तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स बनावट तर नाही ना? असं तपासा

Driving License: अलीकडच्या काळात मोटार वाहन कायदा (Motor Vehicle Act) अधिक कडक करण्यात आला आहे. नवीन मोटार वाहन कायदा लागू झाल्यानंतर वाहतुकीचे नियम मोडल्यास मोठा दंड भरावा लागणार आहे. एखाद्या व्यक्तीने ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय वाहन चालवल्यास 5 हजार रुपये दंडासह 3 महिने तुरुंगवास भोगावा लागू शकतो. त्याचप्रमाणे बनावट ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन वाहन चालविण्याचे कठोर नियम असून त्यात दंडासह शिक्षेची तरतूद आहे. तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सच्या वैधतेबद्दल तुम्हाला शंका असल्यास, तुम्ही येथे नमूद केलेल्या सोप्या स्टेप्सद्वारे ड्रायव्हिंग लायसन्स खरं आहे की बनावट हे जाणून घेऊ शकता.

हेही वाचा: Driving License शिवाय चालवता येणार ही इलेक्ट्रीक स्कूटर

प्रत्येक तिसरं ड्रायव्हिंग लायसन्स बनावट -

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी 2019 मध्ये एका कार्यक्रमात देशातील प्रत्येक तिसरं ड्रायव्हिंग लायसन्स बनावट असल्याचे सांगितले होते. नवीन मोटार वाहन कायद्याबद्दल माहिती देताना ते म्हणाले होते की, यामुळे बनावट ड्रायव्हिंग लायसन्स बंद होतील, तसेच लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत कारण आता ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

बनावट परवान्यांमुळे रस्ते अपघातात वाढ -

NCRB च्या आकडेवारीनुसार देशात दरवर्षी रस्ते अपघातात दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सर्वाधिक रस्ते अपघात हे वाहन नीट चालवता न येणाऱ्या वाहनचालकांमुळे होतात. हे लोक बनावट परवान्याच्या माध्यमातून वाहने चालवतात. आरटीओकडून (RTO) वाहन चालविण्याचा परवाना देण्यापूर्वी एक चाचणी घेतली जाते ज्यामध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहने चालवावी लागतात.

हेही वाचा: Aadhaar, Pan, Voter id, Driving License हरवलंय? असे करा डाऊनलोड

ड्रायव्हिंग लायसन्स खरं आहे की बनावट असं तपासा-

  • सर्वप्रथम https://parivahan.gov.in/parivahan/# या वेबसाइटवर लॉग इन करा.

  • येथे तुम्हाला Online Service वर क्लिक करा.

  • आता तुम्हाला Driving License Related Service चा पर्याय दिसेल.

  • तुम्ही या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर select state चा पर्याय दिसेल, जिथे तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे.

  • यानंतर तुमच्यासमोर एक वेगळी विंडो उघडेल जिथे तुम्हाला Driving licence चा पर्याय असेल, त्यावर क्लिक केल्यावर Service on DLचा पर्याय दिसेल, येथे तुम्हाला क्लिक करावे लागेल.

  • यानंतर, तुम्हाला Continue चा पर्याय दिसेल. तिथे क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक वेगळी विंडो उघडेल.

  • आता तुम्हाला तुमचा DL नंबर, जन्मतारीख आणि तुमचे राज्य पुन्हा सिलेक्ट करावे लागेल.

  • ही संपूर्ण प्रक्रिया केल्यानंतर, तुम्ही ओके करताच, तुमच्या DL चे तपशील समोर येतील. जर तुमच्या DL चे तपशील उघड झाले नाहीत तर समजा तुमचे DL बनावट आहे.

Web Title: Your Driving License Is Fake Isnt It Check It Out

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top