
Mobile Security Tips : आजकाल अनेकदा असं होतं की एखाद्या वस्तूबद्दल बोलल्यानंतर काही वेळातच त्याचे जाहिराती आपल्या मोबाईलवर दिसायला लागतात. सोशल मीडियावर स्क्रोल करताना किंवा अन्य अॅप्स वापरताना आपण ज्यावर चर्चा केली होती त्या वस्तूंच्या जाहिराती समोर येतात. हे योगायोग नसून तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतोय आणि त्यावर आधारित जाहिराती दाखवत आहे.
विशेषतः Android स्मार्टफोन्स वापरणाऱ्यांसाठी ही गोष्ट अधिक गंभीर आहे. गुगलच्या एका सेटिंगमुळे तुमचा फोन सतत तुमचं बोलणं ऐकत असतो. Google Voice Assistant हे फिचर अॅक्टिव्ह असताना तुमचं प्रत्येक बोलणं, तुमचे खाजगी संवाद देखील फोनद्वारे रेकॉर्ड होऊ शकतात.
बरेचदा आपण कोणतंही अॅप इन्स्टॉल करताना विचार न करता मायक्रोफोन, कॅमेरा, लोकेशन आणि कॉन्टॅक्ट्स यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींना अॅक्सेस देतो. अशा प्रकारे तुमची माहिती थेट अॅप डेव्हलपर्सकडे पोहोचते. ही माहिती जाहिरात कंपन्यांना विकली जात असून तुमच्या सवयी, गरजा यांचा मागोवा घेतला जातो.
जर तुम्हाला तुमची खाजगी माहिती जपायची असेल तर आम्ही सांगितलेल्या सोप्या स्टेप्सनुसार गुगल व्हॉईस अॅक्टिविटी बंद करू शकता-
मोबाईलमध्ये Settings उघडा
Google या पर्यायावर क्लिक करा
Manage your Google Account निवडा
नंतर Data and Privacy मध्ये जा
Web & App Activity या पर्यायावर टॅप करा
येथे Voice & Audio Activity शोधा आणि त्याचा चेकबॉक्स अनचेक करा
हे सेटिंग बंद केल्यावर तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकणार नाही. त्यामुळे तुमचं खाजगी आयुष्य सुरक्षित राहू शकतं.
तंत्रज्ञानाचा उपयोग करताना थोडी सावधगिरी आवश्यक आहे. आपल्या सुरक्षिततेसाठी मोबाईल सेटिंग्ज वेळोवेळी तपासा, अॅपसाठी परवानग्या विचारपूर्वक द्या आणि आपल्या गोपनीयतेचे रक्षण करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.