तुमच्या चुकांमुळे स्मार्टफोनला लागू शकते आग! 'या' टिप्स पाळा

तुमच्या 'या' चुकांमुळे स्मार्टफोनला लागू शकते आग! 'या' टिप्स पाळा
तुमच्या 'या' चुकांमुळे स्मार्टफोनला लागू शकते आग! 'या' टिप्स पाळाCanva
Summary

स्मार्टफोनमध्ये आग लागण्याची शक्‍यता खूप कमी आहे, परंतु ही शक्‍यता आपण आपले डिव्हाइस कसे वापरतो यावर देखील अवलंबून असते.

अलीकडेच अमेरिकेतील (America) एका विमानाला स्मार्टफोनला (Smartphone) आग (Fire) लागल्यानंतर रिकामे करावे लागले. स्मार्टफोनमध्ये आग लागण्याची शक्‍यता खूप कमी आहे, परंतु ही शक्‍यता आपण आपले डिव्हाइस कसे वापरतो यावर देखील अवलंबून असते. बहुतेक स्मार्टफोनमध्ये 4,500mAh किंवा त्यापेक्षा जास्त पॉवरची बॅटरी असते. यासह, वेगवान चार्जिंग वैशिष्ट्ये देखील असतात, म्हणून आपला फोन योग्यरीत्या वापरणे खूप महत्त्वाचे आहे. बहुतांश घटनांमध्ये स्मार्टफोन ब्रॅंडने हा वापरकर्त्यांचा दोष असल्याचा दावा केला आहे. स्मार्टफोनमध्ये आगीच्या मागे दहा चुका सांगितल्या जात आहेत, ज्या तुम्ही टाळल्या पाहिजेत.

तुमचा फोन खराब झाला असला तरीही वापरणे : तुमचा स्मार्टफोन तुमच्याकडून अपघाताने पडून खराब झाला असेल तर त्याचा वापर करू नका आणि डिव्हाइसची त्वरित तपासणी करा. याचे कारण असे की,तुटलेला डिस्प्ले किंवा बॉडी फ्रेम पाणी किंवा घामामुळे फोनची बॅटरी किंवा इतर भाग खराब करू शकते. खराब झालेले फोन वापरणे धोकादायक असू शकते.

बनावट किंवा डुप्लिकेट चार्जर वापरणे : फास्ट चार्जिंग अडॅप्टर्स वापरताना खूप काळजी घ्या. तुमच्या स्मार्टफोनसोबत आलेले तेच चार्जर नेहमी वापरा. जास्त पॉवर रेटिंग असलेले चार्जर वापरल्याने तुमच्या फोनची बॅटरी ताणली जाऊ शकते. तसेच डुप्लिकेट चार्जर वापरू नका.

थर्ड पार्टी किंवा बनावट बॅटरी वापरणे : थर्ड पार्टी किंवा बनावट बॅटरी कधीही वापरू नका. अशा बॅटरी वापरल्याने गंभीर सुरक्षा समस्या उद्भवू शकतात. खराब लिथियम-आयन बॅटरीमुळे तुमचा फोन जास्त गरम होऊ शकतो, आग लागू शकते आणि स्फोट होऊ शकतो.

आपला फोन गरम असतानाही वापरणे : जर तुम्हाला लक्षात आले, की तुमचा स्मार्टफोन असामान्यपणे गरम होत आहे, तर तो बाजूला ठेवा, चार्जिंगपासून अनप्लग करा आणि त्यापासून दूर राहा.

मोबाईल चार्ज करण्यासाठी कार चार्जिंग अडॉप्टर वापरणे : ड्रायव्हिंग करताना कार चार्जिंग अडॉप्टरऐवजी पॉवर बॅंक वापरा. याचे कारण असे की, भारतात कार मालक विक्रेत्यांकडून ऍक्‍सेसरीज वापरतात, बहुतेक वेळा वायरिंगच्या गुणवत्तेशी तडजोड करतात. कार चार्जिंग अडॉप्टरने चार्ज करताना, पॉवर अचानक वाढू शकते, ज्यामुळे तुमच्या फोनला आग लागू शकते.

फोन ओव्हरचार्ज करणे : आपला फोन रात्रभर चार्ज करण्यासाठी सोडू नका आणि आपला फोन 100 टक्के चार्ज करणे नेहमीच आवश्‍यक नसते. 90 टक्‍क्‍यांनंतर बॅटरी चार्जिंग बंद करणे ही एक चांगली सवय आहे; कारण ती बॅटरीचे आयुष्य वाढवते. ओव्हरचार्जिंगमुळे तुमच्या फोनची बॅटरी फुगू शकते व ज्यामुळे बॅटरीचा स्फोट होऊ शकतो.

स्थानिक दुकानदारांकडून फोन दुरुस्त करू नका : तुमच्या घराजवळील स्थानिक दुकानदारांकडून फोन दुरुस्त करून घेऊ नका. अधिकृत स्मार्टफोन केंद्राकडून आपला स्मार्टफोन नेहमी दुरुस्त करा. स्थानिक दुकानांमध्ये विशिष्ट उपकरण दुरुस्त करण्यासाठी योग्य प्रकारची उपकरणे असू शकत नाहीत, ज्यामुळे फोनच्या सर्किट्रीमध्ये दोष निर्माण होऊ शकतात.

चार्जिंग करताना फोनला सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा : फोन चार्ज करताना हे लक्षात ठेवा की तुमच्या फोनवर इतर कुठूनही उष्णता येत नाही. थेट सूर्यप्रकाश किंवा इतर गरम गोष्टींपासून दूर ठेवा, विशेषत: ते चार्ज होत असताना.

तुमच्या 'या' चुकांमुळे स्मार्टफोनला लागू शकते आग! 'या' टिप्स पाळा
Apple चे नवीन आयफोन सीरिज उद्या होणार लाँच

स्मार्टफोनवर अनावश्‍यक दबाव टाकणे : आपल्या स्मार्टफोनवर अनावश्‍यक दबाव टाकू नका, विशेषत: चार्ज करताना, त्यावर काहीही ठेवू नका.

स्मार्टफोन पॉवर स्ट्रिप किंवा एक्‍स्टेन्शन कॉर्डला प्लग करून चार्ज करणे : पॉवर स्ट्रिप किंवा एक्‍स्टेन्शन कॉर्ड वापरल्याने शॉर्ट सर्किटचा धोका वाढतो, म्हणून फोन चार्ज करताना हे नेहमी लक्षात ठेवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com