Fake Government scheme : सरकारी योजनांना बळी पडून नका; YouTubeवर फेक जाहिराती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

YouTube

सरकारी योजनांना बळी पडून नका; YouTubeवर फेक जाहिराती

sakal_logo
By
टीम ई सकाळ

आजच्या घडीला प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आलेला आहे. स्मार्टफोन इंटरनेटशिवाय काहीही कामाचा नाही. यामुळे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये इंटरनेट असतोच. यामुळे सोशल मीडियाचा वापर चांगलाच वाढला आहे. व्हॉटॲप, फेसबुक वापरण्याबरोबर यू ट्यूबचाही मोठ्या प्रमाणात वापर होतो. कोणतीही गोष्ट शोधण्यासाठी याचा वापर केला जातो. मात्र, याच यू ट्यूबवरून फसवणूक होत असल्याचे पुढे आले आहे. तेव्हा सावध राहण्याचे गरजेचे झाले आहे.

चोरट्यांना चोरी करण्यासाठी तुमच्या घरीच दरोडा टाकण्याची गरज नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही फसवणूक केली जाते. याचा अनेकांना प्रत्यय आलेला आहे. बँकेतून बोलत असल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्यांची कमी नाही. तसेच अमुक अमुक लिंक पाठवून लुबाळणारेही कमी नाही. एकंदरीत पाहता चोरट्यांनी आपला मोर्चा सोशल मीडियाकडे वळविल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: सेक्समुळे स्पेनचा समुद्रकिनारा झाला उद्ध्वस्त; आढळले २९८ स्पॉट

यू ट्यूबवर अनेकांनी आपले अकाऊंट उघडलेले आहेत. यातून लोकांना संदेश पोहोचवला जातो. तसेच या माध्यमातून फसवणूकही केली जाते. काही फेक यू ट्यूबवर चॅनलवर सरकारी योजनांशी संबंधित तपशील दिला जातो. अशा योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिक क्लिक करतात किंवा संपर्क साधतात. प्रत्यक्षात अशी कोणतीही योजना अस्तित्वात नसते.

फेक चॅनलचा यू ट्यूबवर सुळसुळाट आलेला आहे. यावर प्रधानमंत्री कन्या सन्मान योजना, महिला स्वरोजगार योजना, PM नारी शक्ती योजना २०२१ अशा प्रकारच्या शासकीय योजना दाखविल्या जात आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून नागरिकांना प्रलोभन दाखविले जात आहे. या जाहिरातींना बळी पडून अनेकांची फसवणूक झालेली आहे.

अशा प्रकारच्या कोणत्याही शासकीय जाहिरातींना बळी पडू नका. कोणतीही माहिती दिसल्यास त्याची सत्यता तपासून घ्या. थोडी सावधगिरी दाखवून फसवणूक होण्यापासून वाचा. दुर्भावनापूर्ण हेतूने फसवणूक करणाऱ्यांनी तयार केलेल्या सामग्रीला बळी पडू नका. आपली सुरक्षा आपल्याच हाती आहे, हे विसरू नका.

loading image
go to top