तुम्हाला माहितीये का? YouTube वर आधी डेटिंगची व्हायची सेटिंग, आता... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

YouTube video sharing platform started off as a dating site
तुम्हाला माहितीये का? YouTube वर आधी डेटिंगची व्हायची सेटिंग, आता...

तुम्हाला माहितीये का? YouTube वर आधी डेटिंगची व्हायची सेटिंग, आता...

2016 मध्ये, म्युझिक व्हिडिओ, मेकअप ट्यूटोरियल आणि गेमिंगसाठी ऑनलाइन प्रेक्षकांची पहिली निवड म्हणून YouTube नावारुपाला आले पण, तुम्हाला माहितीये जेव्हा २००५ साली जेव्हा युटयूब लॉन्च झाले होते तेव्हा त्या साईटचा उद्देश होता तो म्हणजे डेटिंग (Dating).होय, तुम्ही योग्य तेच वाचत आहात. टिंडर, बंबल सारख्या प्लॅटफॉर्म आधी युट्यूबची सुरूवात एक डेटिंग साईट म्हणून झाली होती.

2004 साली पे-पाल कर्मचारी स्टिव्ह चेन, चाड हर्ली, जावेद करीम हे तिघे मिळून व्हिडिओ अपलोड करता येईल अशी वेबासाईट तयार करण्याची त्यांची कल्पना होती. १४ फेब्रवारी २००५ साली म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्यांनी युट्यूबसाठी आपला लोगो, ट्रेडमार्क आणि डोमेन रजिस्टर केले.

गार्डियननुसार, सह-संस्थापक स्टीव्ह चेन (Steve Chen)यांच्या मते, मुले-मुली आपल्या स्वप्नांतील जोडीदाराविषयी आणि स्वत:विषयी बोलतानचे व्हिडिओ अपलोड करण्याचा एक मार्ग म्हणून ही साईट डिझाइन केली होती. तुमचा अजूनही विश्वास बसत नसेल तर व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा.

CNETनुसार, SXSW((South by Southwest) कॉन्फरन्समध्ये चेन म्हणाले, "आम्हाला नेहमी वाटायचे की, येथे व्हिडिओशिवाय आणखी काहीतरी आहे. आम्हाला वाटले की, डेटिंग या अॅप्लिकेशनसाठी योग्य निवड असेल."

YouTube video sharing platform started off as a dating site

YouTube video sharing platform started off as a dating site

गेल्या वर्षी YouTube सह-संस्थापक जावेद करीम (Jawed Karim)यांनी देखील YouTube च्या रोमँटिक सुरूवातीबाबत बोलत होते. या डेटिंग वेबसाईट म्हणून सुरू केलेल्या यूट्यूब साठी त्यांनी 'ट्यून इन, हुक अप," असा एक एक स्लोगनही त्यावेळी तयार केले होता. पण आम्हाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. आम्ही काही रोमँटिक डेटिंग व्हिडिओची अपलोड होण्याची वाट पाहत होतो पण, लोक डेटिंग व्हिडिओ अपलोड करतच नव्हते. त्याऐवजी ते वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ साईटवर अपलोड करत होते त्यामुळे ही वेबसाईट क्रेगलिस्ट (Craigslist म्हणजेच वर्गीकृत जाहिरातीअसलेली आणि समुदायिक सूचनेचे पालन करणारी वेबसाईट) ठरली.

YouTube वर स्वतःचे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी महिलांना $20 देण्याची ऑफर असूनही, कोणीही पुढे आले नाही. त्यामुळे चेन, करीम आणि सह-संस्थापक चाड हर्ली (Chad Hurley) यांना वेगळे धोरण स्वीकारण्यास भाग पाडले.

अखेर त्यांनी लोकांना जे हवे तेच आपण त्यांना या प्लॅटफॉर्ममार्फत देऊ या असे ठरवले.याबाबत SXSW येथे बोलतना चेन म्हणाले, की ''ठिके, डेटिंगचा विषय सोडून देऊ आणि कोणत्याही व्हिडिओसाठी आपण तयार राहूया''

YouTube video sharing platform started off as a dating site

YouTube video sharing platform started off as a dating site

आज आपण ज्या युट्यूबला ओळखतो हे सुरूवातीस सर्व प्रकारच्या व्हिडिओ कंटेटसाठी मोफत व्हिडिओ होस्टिंग प्लॅटफॉर्म होते.

YouTubeचा पहिला अधिकृत व्हिडिओ करीमचा होता. १८ सेकंदाच्या हत्तींच्या व्हिडिओने तेव्हा इतिहास रचला होता. २००६ मध्ये गुगलने 1.65 अब्ज डॉलरमध्ये युट्युब ताब्यात घेतले. सध्या युट्यूब अब्जावधीमध्ये कमावत असून जगातील दुसऱ्या क्रमांकावरील सर्च इंजिन आहे.

चेन आणि त्याच्या सह-संस्थापकांची मूळ कल्पनेत काहीतरी तथ्य होते हे Tickr, 15 Winks आणि Charm सारख्या व्हिडिओ-डेटिंग अॅप्सला अद्याप हे सिद्ध करायचे आहे. Grindr आणि Tinder सारख्या डेटिंग अॅप्स सध्या फोटोवर फोकस करत आहे.

YouTube मधून बाहेर पडल्यानंतर, चेन सध्या त्याचे लक्ष प्रेमापासून रोमँटिक ऐवजी जीवनातील दुसर्‍या पैलूकडे वळवत आहे तो म्हणजे अन्न. त्याने अलीकडेच Nom नावाचे लाइव्ह-व्हिडिओ स्टार्टअप लाँच केले, जे व्यावसायिक आणि हौशी शेफ प्रेक्षकांशी गप्पा मारत, त्यांच्या स्वयंपाकघरात स्वयंपाक करतात.

Web Title: Youtube Video Sharing Platform Started Off As A Dating Site

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top