YouTube चा मोठा निर्णय, आता दिसणार नाही डिसलाईक्सची संख्या; वाचा डिटेल्स | YouTube Dislike Count | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

YouTube News In Marathi

YouTube चा मोठा निर्णय, आता दिसणार नाही डिसलाईक्सची संख्या

व्हिडिओ प्लॅटफॉर्म YouTube वरील व्हिडिओला अनेकदा मिळालेल्या डिसलाईक्सच्या संख्येमुळे व्हिडिओ निर्मात्याला (Content Creators) ट्रोल करण्यात येते, पण आता मात्र यापासून युट्यूबवरील कंटेट क्रियटर्सची सुटका होणार आहे. कारण आता YouTube ने प्लॅटफॉर्मवरील व्हिडिओखाली दिसणारी डिसलाईक संख्या (Dislike Count) प्रायव्हेट करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आता सर्व वापरकर्त्यांना व्हिडिओला मिळालेल्या डिसलाईक्सची संख्या दिसणार नाही.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे पाऊल व्हिडिओ बनवणाऱ्या क्रियटर्सना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांना ट्रोलर्सच्या छळापासून वाचवण्यासाठी उचलण्यात आले आहे. कंपनीने म्हटले आहे की, यूट्यूबवरील व्हिडिओ किती लोकांनी डिसलाईक केला आहे, ते आता इतर लोकांना दिसणार नाही. काही देशांमध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामने वापरकर्त्यांना हे फीचर बंद करण्याचा पर्यायही दिला आहे.

भारतासह जगभरातील YouTube वर व्हायरल व्हिडिओ किंवा सोशल मीडिया पोस्टसाठी मिळालेल्या लाइक्स आणि डिसलाईक्सच्या आधारावर बऱ्याच जणांना ट्रोल केले जाते. हे हल्ले कधीकधी Content Creators वैयक्तिकरित्या देखील केले जातात. यामुळे कंपनीने याआधी व्हिडिओमधील डिसलाइक बटण डिसेबल करण्याची सुविधा दिली होती. मात्र, आता निर्मात्यांची जुनी मागणी पूर्ण करत यूट्यूबने डिसलाईक्सची संख्या लपवण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: लॉंच झाली देशातील सर्वाधिक मायलेज देणारी कार, पाहा किंमत

याचा परिणाम काय होईल?

वापरकर्ते अजूनही Google च्या व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म YouTube वर व्हिडिओ डिसलाईक करु शकतील, परंतु इतर किती जणांनी तो डिसलाईक केला आहे हे ते ते त्यांना दिसणार नाही. जगभरात ऑनलाइन छळ (Online harassment) घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सोशल मीडिया साईट्स चालवणाऱ्या कंपन्या याबाबत कोणतीही ठोस पावले उचलत नसल्याच्या तक्रारी राजकारणी, अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते सातत्याने करत असतात. या वादांमुळे फेसबुकला अलीकडे अनेक मोठ्या हल्ल्यांना सामोरे जावे लागले आहे. आता यामध्ये काय फरक पडतो ते पाहण्यासारखे आहे.

हेही वाचा: महिंद्राची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; एका चार्जवर धावेल 140 किमी

loading image
go to top