esakal | कोविड रुग्णांना प्राधान्यक्रमाने मिळणार होम डिलिव्हरी; Zomato ची खास ऑफर

बोलून बातमी शोधा

Zomatos delivery boy goes on strike in Pune
कोविड रुग्णांना प्राधान्यक्रमाने मिळणार होम डिलिव्हरी; Zomato ची खास ऑफर
sakal_logo
By
शर्वरी जोशी

देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच स्तरांमधून प्रयत्न करण्यात येत आहेत. या संकट काळातही आपला व्यवसाय सुरळीत सुरु रहावा यासाठी Zomato आणि स्विगीसारख्या कंपन्या प्रयत्नशील आहे. विशेष म्हणजे Zomatoने आता त्यांच्या अॅपच्या माध्यमातून Apple iPhone आणि Android फोनसाठी एक नवीन सेवा सुरु केली आहे. यामध्ये आता 'Covid-19 इमरजन्सी' या नव्या कॅटेगरीचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे Covid-19 च्या माध्यमातून ऑर्डर दिल्यास प्रथम त्या ग्राहकांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

Zomato कडून देण्यात आलेल्या या इमरजन्सी ऑर्डरचा पर्याय कॉन्टॅक्टलेस असणार आहे. म्हणजे, प्रीपेड असून पदार्थांची डिलिव्हरहीदेखील कॉन्टॅक्टलेस ( संपर्कहीन) असणार आहे. विशेष म्हणजे ज्या रेस्टॉरंट किंवा हॉटेल्सने इमरजन्सी फूडची ऑर्डर साइन अप केली आहे त्याच रेस्टॉरंटमध्ये हा पर्याय उपलब्ध असणार आहे. Covid-19 इमरजन्सीसाठी देण्यात आलेल्या या पर्यायासाठी कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाहीये.

हेही वाचा: कोरोनाच्या भीतीमुळे वडिलांना सोडलं भररस्त्यात; हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल

कोरोनाग्रस्तांपर्यंत वेळेत जेवण पोहोचावं यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. तसंच आमचे कर्मचारी व ग्राहक यांच्या सुरक्षेसाठी ही सोय कॉन्टॅक्टलेस करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आता ग्राहकांना परिस्थितीची पूर्ण कल्पना आली आहे त्यामुळे ते स्वत: कॉन्टॅक्टलेस चा पर्याय निवडत आहेत, असं झोमॅटोचे को फाऊंडर दिपिंदर गोयल यांनी सांगितलं.

Covid-19 इमरजन्सी हा ऑप्शन जेव्हा खरंच गरज असेल तेव्हाच वापरा असं आवाहनदेखील त्यांनी केलं आहे. विशेष म्हणजे Zomato च्या या नव्या योजनेमुळे आता कोविडग्रस्तांनादेखील जेवणाची ऑर्डर देता येणार आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे याविषयी चर्चा रंगली आहे.