Zoom मिटिंगमध्येही करता येणार झूम झूम, नवीन फिचर्स पळवेल कंटाळा

टीम ई सकाळ
Thursday, 11 February 2021

शाळा बंद असल्याने घरातून गुगल मिटवर किंवा झूमवर त्यांचे लेक्चर होतात. बहुतांशी कंपन्यांच्या मिटिंगही याच अॅपच्या माध्यमातून होतात.

अहमदनगर ः लॉकडाउनपासून बरेच भारतीय टेन्को सॅव्ही झाले आहेत. खरे तर त्यांना कोरोनाने ही संधी दिली आहे. शाळा बंद असल्याने घरातून गुगल मिटवर किंवा झूमवर त्यांचे लेक्चर होतात. बहुतांशी कंपन्यांच्या मिटिंगही याच अॅपच्या माध्यमातून होतात.

मोठ्या प्रमाणात वापर वाढल्याने या अॅपने आपला तोंडवळा बदलला आहे. नवीन फिचर्स त्यात अॅड केले आहेत. झूमने तर कमालच केली आहे. हे अॅप वापरताना लोकांना आनंद मिळावा यासाठी त्यांनी नवीन फिचर्स आणले आहेत.

हेही वाचा - अजितदादांच्या एका शब्दाने फिरलं राजकारण, पिचडांसमोर केला पेच

झूमवर कॉल सुरू असताना आयब्रो, फेसिअल हेअर, लिप कलर बदलता येणार आहे. इनफॉर्मल मिटिंग सुरू असताना त्याचा वापर तुम्ही करू शकता.

भारतात लॉकडाउन लागले आणि लोकांना हे अॅप माहिती झाले. झूमची तर मोठी लोकप्रियता वाढली. हे अॅप वापरायला सोप असल्याने बहुतांशी वापरकर्ते यालाच प्राधान्य देतात. वारंवार अॉनलाईन मिटिंग झाल्याने लोक त्रासून जातात. हे टाळण्यासाठी कंपनीने नवीन टेक्नॉलॉजी आणली आहे.

या नवीन फिचर्समध्ये आपल्याला आयब्रो, फेसिअल, हेअर कलर बदलण्याचा मोका मिळणार आहे. इनफॉर्मल मिटिंगमध्ये त्याचा तुम्ही उपयोग करू शकता.

The verge या इंग्रजी वेबसाइटच्या रिपोर्टनुसार zoom चा स्टुडिओ इफेक्ट फिचर नवीन नाही. हे  beta वर्जन पहिल्यापासून उपलब्ध आहे. zoom ने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये windows आणि macOs साठी त्याची घोषणा केली होती. studio effects डेस्कटॉप अॅप  हे केवळ मोजक्याच zoom युजर्ससाठी उपलब्ध आहे

असा करा उपयोग ः

झुम मिटिंगवर जाऊन कोणताही एक सेक्शन निवडावा लागेल. त्यानंतर व्हिडिओ सेटिंगमध्ये अॉप्शनपर्यंत जावे लागेल. त्यानंतर बॅकग्राउंड आणि फिल्टरचा वापर करावा लागेल. तेथे स्टुडिओ इफेक्ट निवडावा लागेल. तेथूनच तुम्ही नवीन इफेक्ट देऊ शकता.

नवीन आलंय झूम रूम

झूमने नुकतेच नवीन फिचर आणले आहे. झूम रूम्स असे त्याचे नाव आहे.नवीन लोकांना मिटिंगमध्ये नवीन पद्धतीने जॉईन करता येणार आहे. झूमच्या या लोकप्रियतेनंतर गुगलने स्वतःचे गुगल मीट हे अॅप लॉन्च केले होते.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zoom zoom can also be done in a zoom meeting