

Right to Information Ethics
esakal
अभिजित मोदे
एक सार्वजनिक माहिती अधिकारी (PIO) यांना माहितीचा अधिकार (RTI) कायद्यानुसार अर्ज प्राप्त होतो. आवश्यक कागदपत्रे व माहिती गोळा केल्यानंतर त्यांना समजते की, ही माहिती त्यांच्या काही जुन्या निर्णयांशी संबंधित आहे आणि हे निर्णय पूर्णपणे योग्य नव्हते. या निर्णयांमध्ये इतर काही कर्मचारीदेखील सहभागी होते. संपूर्ण माहिती उघड केल्यास त्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या विरोधात विभागीय चौकशी होऊन शिक्षेची शक्यता आहे. माहिती न देणे, अर्धवट देणे किंवा माहिती लपवणे आदी गोष्टी केल्यास शिक्षा कमी होईल किंवा टळेल. हा PIO एकूणच प्रामाणिक व कर्तव्यदक्ष आहे; मात्र या एका निर्णयात चूक झाली आहे. तो तुमच्याकडे सल्ल्यासाठी येतो. खाली काही पर्याय दिले आहेत; प्रत्येक पर्यायाचे गुणदोष समजावून सांगा आणि शेवटी तुम्ही कोणता सल्ला द्याल ते कारणांसह नमूद करा.
उत्तर :
परिचय
या प्रकरणात पारदर्शकता व स्वसंरक्षण यात संघर्ष दिसतो. माहितीचा अधिकार कायदा नागरिकांना सत्य माहिती मिळवण्याचा हक्क देतो आणि PIO वर प्रामाणिकपणे व वेळेत माहिती देण्याची स्पष्ट जबाबदारी टाकतो. चुकीचा निर्णय मान्य करूनही संपूर्ण सत्य सांगावे की, स्वतःला व सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी माहिती लपवावी, हा मुख्य नैतिक द्वंद्व आहे. प्रामाणिकता, जबाबदारी, कायद्याचा आदर व सार्वजनिक हित या नैतिक मूल्यांची कसोटी येथे लागते.