
The Science Behind Temperature Inversion and Its Impact on Daily Life
E sakal
Understanding Temperature Inversion: A Hidden Threat to Crops and Air Quality
लेखक : निखिल वांधे
प्रश्न १ : हवामानशास्त्रात तापमान व्युत्क्रमण (Temperature Inversion) या घटनेचा अर्थ काय आहे? याची निर्मिती कशी होते आणि याचा स्थानिक हवामान, शेती व त्या ठिकाणच्या रहिवाशांवर कसा परिणाम होतो?
सर्वसाधारणपणे, पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात खालच्या थरात (तपांबर) उंचीनुसार तापमान कमी होत जाते. परंतु काही विशिष्ट परिस्थितींमध्ये या नैसर्गिक नियमाच्या उलट घडते; म्हणजेच जमिनीलगतच्या हवेच्या थरापेक्षा जास्त उंचीवरील हवेचा थर अधिक उष्ण असतो. उंचीनुसार तापमान कमी होण्याऐवजी वाढण्याच्या या प्रक्रियेला 'तापमान व्युत्क्रमण' (Temperature Inversion) म्हणतात.