
artificial Inteligence
E sakal
Artificial Intelligence: Benefits, Risks and Future of Human-AI Relationship
लेखक – महेश शिंदे
कधी काळी विज्ञानकथांच्या पुस्तकांत वाचलेली कल्पना आज आपल्या हातातल्या मोबाईलमध्ये जिवंत झाली आहे. मशीनही विचार करू शकते, शिकू शकते आणि निर्णय घेऊ शकते ही गोष्ट आता फक्त कल्पनारम्य नाही, तर आपल्या आयुष्याचा रोजचा अनुभव झाली आहे. हाच प्रवास म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता, ज्याला आपण Artificial Intelligence किंवा AI म्हणून ओळखतो.
भूतकाळ : कृत्रिम बुद्धिमत्तेचा जन्म
दुसऱ्या महायुद्धानंतर जग विज्ञानाकडे नव्या नजरेने पाहू लागलं. १९५० मध्ये ब्रिटिश शास्त्रज्ञ ॲलन ट्युरिंग यांनी पहिल्यांदा प्रश्न विचारला “मशीन विचार करू शकते का?” याच प्रश्नातून कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रवास सुरू झाला आणि यावरून ‘ट्युरिंग टेस्ट’ तयार झाली, जी आजही मशीन हुशार आहे का हे तपासण्यासाठी वापरली जाते. १९५६ मध्ये अमेरिकेतील ‘डार्टमथ’ परिषदेत जॉन मॅकारथी यांनी Artificial Intelligence हा शब्द वापरला आणि हाच AI चा औपचारिक जन्म मानला जातो. कृत्रिम बुद्धिमत्ता ही संगणक विज्ञानाची अशी शाखा आहे ज्यात मशीनला डेटा वापरून शिकता येतं, अनुभवातून सुधारता येतं आणि मानसारखं विचारपूर्वक निर्णय घेता येतात.
सुरुवातीला संगणक हिशोब करायचे, खेळ शिकायचे, भाषेतील नमुने ओळखायचे, पण त्यांची मर्यादा होती. संगणक हळू होते, डेटा कमी होता, तंत्रज्ञान महाग होतं. इंटरनेट, मोबाईल आणि प्रचंड डेटा आल्यानंतर मात्र AI ला खरा वेग मिळाला.