

AI and Automation
E sakal
लेखक : श्रीकांत जाधव
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) म्हणजे केवळ तंत्रज्ञानातील नवा टप्पा नाही, तर ती जगभरातील उद्योगसंस्कृती बदलवते आहे.
कंपन्या कामकाज झपाट्याने स्वयंचलित करत आहेत. उत्पादन, वित्त, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान अशा प्रत्येक क्षेत्रात AI मुळे कार्यक्षमता वाढली, खर्च कमी झाला आणि मानवी श्रमावर अवलंबन घटले. पण या प्रगतीमागे एक गंभीर परिणाम आहे.
नोकरी कपात आणि कौशल्य पुनर्रचनेची गरज.
भारतामध्ये हा बदल अधिक तीव्र आहे. कारण देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर आयटी आणि बीपीओ क्षेत्रावर आधारित आहे. विश्लेषकांच्या अंदाजानुसार, २०२५ पर्यंत सुमारे ५०,००० नोकऱ्या AI मुळे धोक्यात येऊ शकतात.
कंपन्या उघडपणे कपाती जाहीर करत नसल्या तरी अनेक ठिकाणी ‘सायलेंट ले-ऑफ’ सुरू आहेत. हे केवळ
कामकाजातील सुधारणा नाही, तर अर्थव्यवस्थेच्या संरचनेतील आमूलाग्र बदल आहे.