

Corporate Social Responsibility
esakal
लेखक - अभिजित मोदे
एका प्रमुख औषध कंपनीच्या R&D (संशोधन आणि विकास) प्रयोगशाळेतील एका शास्त्रज्ञाला असे आढळले की, कंपनीच्या सर्वाधिक विक्रेत्या पशुवैद्यकीय औषध 'B' चा वापर करून सध्या असाध्य असलेल्या यकृत विकाराचे (लिव्हर डिसीज) उपचार शक्य आहेत. हा विकार आदिवासी भागात खूप आहे. मात्र, हे औषध मानवासाठी योग्य करण्यासाठी ५० कोटी रुपयांचा संशोधन खर्च लागेल. गरीब भागात असल्याने कंपनीला खर्च परत मिळवणे कठीण आहे. तुम्ही CEO (सीईओ) आहात हे समजून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या.
अ. उपलब्ध असणाऱ्या विविध पर्यायांची ओळख पटवा.
ब. प्रत्येक पर्यायाचे फायदे आणि तोटे सांगा.