
Drone in Army
E sakal
Cold Start 2025 : India tri-service drone & counter-drone drill
लेखक : सचिन शिंदे
भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दल ऑक्टोबर २०२५ मध्ये मध्यप्रदेशात एका ऐतिहासिक संयुक्त ड्रोन आणि प्रतिड्रोन युद्धसरावाचे आयोजन करणार आहेत. ‘कोल्ड स्टार्ट’ नावाच्या या महत्त्वाकांक्षी सरावात तिन्ही सैन्यदलांबरोबरच इंडस्ट्री पार्टनर्स, शोध संस्था आणि विद्यापीठांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. हा युद्धसराव प्रत्यक्ष लढाईच्या परिस्थितीत भारताच्या आधुनिक ड्रोन आणि हवाहल्ला संरक्षण क्षमतेची चाचणी घेईल.