Premium|Study Room : न्यायालयाचा अवमान म्हणजे काय.? घटनेत काय तरतूद आहे?

Contempt of Court : सरन्यायाधिश गवई यांच्या दिशेने बूट फेकल्याचं प्रकरण गाजलं पण त्यानिमित्ताने जाणून घेऊ, भारतीय घटनेतील कलम १२९ आणि २१५ अंतर्गत न्यायालयाचा अवमान म्हणजे काय? याविषयी.
न्यायालयाचा अवमान म्हणजे काय? घटनेतील तरतुदी

न्यायालयाचा अवमान म्हणजे काय? घटनेतील तरतुदी

E sakal

Updated on

Contempt of Court in India: Meaning, Types, and Legal Provisions

लेखक : अभिजित मोदे

ऑक्टोबर २०२५ मध्ये एका परिवादक (litigating) वकिलाने सरन्यायाधीश (CJI) बी.आर. गवई यांच्या दिशेने न्यायालयात बूट फेकण्याचा प्रयत्न केला. हे वर्तन न्यायालयाने 'तत्काळ अवमान' (contempt on the face of it) असे मानले. मात्र, सरन्यायाधीशांनी मोठ्या मनाने त्या वकिलाला माफ केले, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अवमानविषयक कारवाई न करण्याचा निर्णय घेतला. न्यायालय म्हणाले की, अशा प्रकारच्या घटनांमध्ये न्यायाधीशाचाच निर्णय महत्त्वाचा असतो आणि जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे कधी कधी संस्थेच्या प्रतिमेसाठी चांगले असते.​

न्यायालयाचा अवमान म्हणजे न्यायालयाच्या आदेशाची जाणीवपूर्वक अवज्ञा करणे किंवा न्यायालयाच्या अधिकाराचा, सन्मानाचा अपमान करणे होय. यात न्यायालयाचे आदेश न पाळणे, खोटी माहिती देणे किंवा न्यायालयाच्या प्रक्रियेत अडथळा आणणे यांचा समावेश होतो. अशा वर्तनामुळे न्यायव्यवस्थेचा अधिकार व प्रतिष्ठा धोक्यात येते, म्हणूनच याला गंभीर गुन्हा मानले जाते.​

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com