

Public Service vs Personal Duty
esakal
विजय गेली दोन वर्षे देशाच्या उत्तरेकडील डोंगराळ राज्यातील दुर्गम जिल्ह्याचा जिल्हाधिकारी (उप आयुक्त) म्हणून काम करत होता. ऑगस्ट महिन्यात संपूर्ण राज्यात अतिवृष्टी झाली आणि त्याच जिल्ह्याच्या वरच्या भागात ढगफुटी झाली. त्यामुळे संपूर्ण राज्यात विशेषतः त्या जिल्ह्यात प्रचंड हानी झाली. संपूर्ण रस्ते जाळे व दूरसंचार व्यवस्था खंडित झाली आणि इमारतींनाही मोठे नुकसान झाले. लोकांची घरे उद्ध्वस्त झाली व त्यांना मोकळ्या जागेत राहणे भाग पडले. २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे ५००० जण गंभीर जखमी झाले. विजयच्या नेतृत्वाखालील नागरी प्रशासनाने तत्काळ हालचाल करून बचाव व मदतकार्य सुरू केले. बेघर व जखमी लोकांना तात्पुरता निवारा व उपचार मिळावेत म्हणून शिबिरे व रुग्णालये उभारली गेली. हेलिकॉप्टरची सोय करून दुर्गम भागातील आजारी व वृद्ध लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात झाली.