जन्म १ जून १९३०, पुणे शहर, महाराष्ट्र.जन्मस्थळ व कार्यक्षेत्र दोन्हीही प्रामुख्याने पुणेच राहिले; तळागाळातील मजुरांमध्ये मिसळूनच त्यांनी आयुष्य घालवले..शिक्षण● त्यांनी पुण्यातच शिक्षण घेतले; बी.एस्सी. आणि वैद्यकीय शास्त्रातील डिप्लोमा (आयुर्वेदिक) असे उच्च शिक्षण पूर्ण केले.● रस्ता पेठ येथील ताराचंद रामनाथ आयुर्वेदिक महाविद्यालयातून वैद्यकीय डिप्लोमा घेतल्यानंतर त्यांनी नाना पेठ परिसरात औषधालय सुरू केले, पण पुढे पूर्ण वेळ सामाजिक चळवळीतच झोकून दिले..कष्टकऱ्यांचा डॉक्टर, सत्यशोधकांचा वारसा - अंबर आढाव (डॉ. बाबा आढाव यांचे धाकटे चिरंजीव).सामाजिक व राजकीय योगदान● १९५०च्या दशकापासून गोवा मुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, दुष्काळातील धान्यदरवाढ विरोधातील सत्याग्रह अशा चळवळींमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला; या कालावधीत त्यांना अनेकदा तुरुंगवासही भोगावा लागला.● हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, कचरा वेचणारे, फेरीवाले अशा असंघटित मजुरांच्या संघटना उभ्या करून त्यांना वेतन, विमा, निवारा, शिक्षण, आरोग्य यांचा लढा संघटितपणे लढवला.● ‘कष्टाची भाकर’ योजना, ‘एक गाव एक पाणवठा’ मोहीम, अंधश्रद्धाविरोधी चळवळ तसेच अलीकडच्या काळात ईव्हीएम व निवडणुकांतल्या पैशाच्या वापराविरोधातील आंदोलन अशा उपक्रमांतून त्यांनी न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांना धार दिली..पुरस्कार व सन्मानअसंघटित कामगारांसाठी केलेल्या बहुआयामी कार्याबद्दल त्यांना ‘टाइम्स ऑफ इंडिया सोशल इम्पॅक्ट -लाइफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’सह अनेक राष्ट्रीय स्तरावरील गौरव मिळाले.अधिक माहितीसाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या खास टिप्ससाठी सकाळ स्टडी रूम जरूर वाचा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.