

Indian Bureaucracy Evolution
esakal
लेखक : अभिजित मोदे
भारतातील नोकरशाही ही देशाच्या प्रशासनाचा मेरुदंड आहे, पण आज ही नोकरशाही अनेक नैतिक आणि व्यावहारिक समस्यांनी ग्रासलेली आहे. सुधारणांद्वारे तिला अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि जनकेंद्रित बनवता येईल.
नोकरशाहीचा इतिहास आणि विकास
अ) स्वातंत्र्यपूर्व काळ :
भारतातील नोकरशाहीची सुरुवात ब्रिटिश राजवटीत झाली. १८५८ च्या भारत सरकार अधिनियमाने सिव्हिल सर्व्हिसेसची स्थापना झाली, जी मुख्यतः ब्रिटिश हितसंबंधांसाठी होती. भारतीयांसाठी ICS भरती सुरू झाली, पण ती मर्यादित होती. या काळात नोकरशाही कठोर, केंद्रीकृत आणि अभिजनवादी होती.
ब) स्वातंत्र्योत्तर काळ :
१९४७ नंतर नोकरशाहीने लोकशाही मूल्ये स्वीकारली. संविधानाने UPSC ची स्थापना केली आणि IAS, IPS सारख्या सेवांचा पाया घातला. सरदार पटेल यांनी तिला 'स्टील फ्रेम' म्हणून संबोधले. मात्र, राजकीय हस्तक्षेप वाढला आणि ती राजकीय साधन बनली.