

The Role and Legal Basis of Special Intensive Revision (SIR)
E sakal
लेखक : महेश शिंदे
भारतीय निवडणूक आयोगाने ऑक्टोबर २०२५ मध्ये निवडणूक मतदार यादीच्या विशिष्ट आणि समग्र फेरतपासणी किंवा फेरनिरीक्षणासाठी देशभरात Special Intensive Revision (SIR) कार्यवाही जाहीर केली आहे. ही कार्यवाही निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि योग्यता सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाची आहे.
या SIR चा उद्देश आहे निवडणूक यादीतील सर्व पात्र मतदारांचा समावेश करणे, तसेच कुठलाही बोगस आणि दुहेरी नोंदी यादीत राहू नयेत याची खात्री करण्याचा. ही प्रक्रिया १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये होणार आहे, ज्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकांसाठी असलेली राज्ये आहेत.