

Career Guidance Seminar Kolhapur
esakal
कोल्हापूर : वाठार तर्फ वडगाव येथील अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये विद्यार्थ्यांसाठी “स्पर्धा परीक्षेची तयारी” या विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. सकाळ स्टडीरूम आणि ज्ञानदीप अकॅडमी यांच्या संयुक्त सहकार्याने हे सत्र घेण्यात आले. या कार्यक्रमाला विविध अधिकारी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहन दिले.
गटविकास अधिकारी सूरज गावडे यांनी सांगितले की, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांमधून अधिकारी होण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. अलीकडे या क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे यश वाढत असून, त्यांनी स्पष्ट ध्येय ठरवून नियोजनबद्ध अभ्यास, सातत्य आणि आत्मविश्वास ठेवणे गरजेचे आहे. यशासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागतो, असेही त्यांनी सांगितले.