Premium|Study Room : कॉर्पोरेट प्रशासनात नैतिकता का महत्त्वाची आहे?

Ethical Corporate Governance : नैतिक कॉर्पोरेट प्रशासनातून कंपनीच्या व्यवस्थापनात पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि उत्तरदायित्वाला महत्त्व दिले जाते. नफ्यासोबत भागधारक, कर्मचारी, ग्राहक, समाज आणि पर्यावरणाप्रती जबाबदारीही महत्त्वाची ठरते.
Corporate Governance

Corporate Governance

esakal

Updated on

लेखक : अभिजित मोदे

कॉर्पोरेट प्रशासन म्हणजे कंपनीचे व्यवस्थापन, नियंत्रण आणि निर्णयप्रक्रिया यांना योग्य दिशा देणारी व्यवस्था होय. कंपनीने केवळ नफा मिळवणे पुरेसे नसून, भागधारक, कर्मचारी, ग्राहक, सरकार, समाज आणि पर्यावरण यांच्याप्रती जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. या व्यवस्थेत नैतिकता, पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि उत्तरदायित्व यांना महत्त्व दिले जाते. म्हणूनच नैतिक कॉर्पोरेट प्रशासन हे आधुनिक व्यवसायव्यवस्थेचे महत्त्वाचे अंग बनले आहे.

नैतिक कॉर्पोरेट प्रशासन म्हणजे काय?

नैतिक कॉर्पोरेट प्रशासन म्हणजे कंपनीचे निर्णय कायद्याचे पालन करून, न्याय्य पद्धतीने आणि समाजहित लक्षात घेऊन घेणे. कंपनीचे संचालक आणि वरिष्ठ अधिकारी यांनी वैयक्तिक स्वार्थापेक्षा कंपनीच्या व सर्व संबंधित घटकांच्या हिताला प्राधान्य दिले पाहिजे. आर्थिक व्यवहारांमध्ये प्रामाणिकपणा, माहितीमध्ये पारदर्शकता, कर्मचाऱ्यांशी समान वागणूक आणि पर्यावरणाचे संरक्षण ही त्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com