
लेखक : अभिजित मोदे
प्रश्न : खालील उद्धरणावरून (Quote) तुम्हाला काय समजले ते स्पष्ट करा.
“There is enough for everybody's need and not for anybody's greed”: Mahatma Gandhi
“प्रत्येकाच्या गरजेसाठी पुरेल एवढे आहे, पण एखाद्याच्या लोभासाठी पुरेल एवढे नाही." : महात्मा गांधी
उत्तर :
प्रस्तावना
जगातील सर्व मानव, प्राणी आणि निसर्ग यांच्या जवळ असलेली साधनसंपत्ती, संसाधने ही सर्वजणांनी मिळून वापरावी, असा गांधीजींचा संदेश आहे. ते म्हणतात, 'पृथ्वीवर इतकी साधनसंपत्ती आहे की, प्रत्येक माणसाच्या मूलभूत गरजा पुरवता येतात, पण जेव्हा कुणी एकटा लोभ ठेवून जास्त घेतो, तेव्हा मात्र ती कमी पडते. समाजातील समता, संयम, आणि मानवतेसाठी हे विचार आजही महत्त्वाचे आहेत.