
Gen Z’s Digital Dialogue: From Social Media to Social Change
E sakal
लेखक - सत्यजीत हिंगे
तंत्रज्ञानाच्या युगात उदयास आलेली 'जनरेशन झेड' (Gen Z) आपल्या वेगळ्या शैलीने समाजाशी संवाद साधत आहे. १९९७ ते २०१० या काळात जन्मलेल्या या पिढीसाठी मोबाईल आणि सोशल मीडिया हे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. आता ते केवळ बोलून किंवा चालून नाही, तर 'मीम शेअर करून', 'व्हायरल व्हिडिओ तयार करून' आणि 'इंस्टाग्राम स्टोरीज' व 'ट्विटर थ्रेड्स' यांसारख्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करतात.