Premium|Study Room : हिमनद्यांच्या वितळण्यासोबत वाढतोय GLOF चा धोका!

Glacial Lake Outburst Flood : हिमनदीजन्य सरोवराचा नैसर्गिक बंधारा तुटल्यास मोठ्या वेगाने पाणी खाली वाहते आणि GLOF पूर निर्माण होतो. हवामान बदलामुळे हिमनद्या वितळत असल्याने हा धोका वाढत आहे.
Glacial Lake Outburst Flood

Glacial Lake Outburst Flood

esakal

Updated on

लेखक - सागर रेपाळे

हिमनदीजन्य सरोवराचा अचानक उद्रेक होऊन येणारा पूर म्हणजे Glacial Lake Outburst Flood (GLOF) होय. हिमनदीजन्य सरोवरात साठलेले पाणी त्याचा नैसर्गिक बंधारा किंवा सीमा अचानक तुटल्यामुळे मोठ्या वेगाने खालील भागात वाहून जाते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण होते. हा नैसर्गिक बंधारा बर्फ, गाळ किंवा मोरेनपासून बनलेला असू शकतो. हिमस्खलन, भूस्खलन, भूकंप, अतिवृष्टी आणि बर्फाचे मोठे तुकडे सरोवरात कोसळणे यांसारख्या कारणांमुळे GLOF उद्भवू शकतो. हवामान बदलामुळे हिमनद्या वेगाने वितळत असल्याने हिमनदीजन्य सरोवरांचा आकार आणि पाण्याचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे GLOF चा धोका अधिक तीव्र होत आहे. भारतीय हिमालयात ५,००० पेक्षा अधिक हिमनदीजन्य सरोवरे आढळली आहेत. या प्रदेशाचे तापमान दर दशकाला सुमारे ०.३°C ने वाढत असून, ते जागतिक सरासरीच्या जवळपास दुप्पट आहे. UNEP नुसार, GLOF घटनांची संख्या दर दशकाला २ वरून ३० पर्यंत वाढली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com