

जल जीवन मिशन आणि पारदर्शकतेचा अभाव : प्रशासनातील धडे
ई सकाळ
लेखक : अभिजित मोदे
जल जीवन मिशन अंतर्गत अनेक ठिकाणी निधीचा अपव्यय, भ्रष्टाचार, अपूर्ण कामे आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचे समोर आले आहे. उदाहरणार्थ, काही जिल्ह्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचा खर्च दाखवला, पण प्रत्यक्षात ग्रामीण घरांना नळजोडणी मिळाली नाही; महिलांना अजूनही पाण्यासाठी मैलोनमैल चालावे लागते. सरकारच्या विविध योजनांसाठी लाखो कोटींनी निधी खर्च केला जातो, पण अनेकदा हा निधी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतच नाही. ही परिस्थिती म्हणजे समाजाच्या सहभाग आणि जबाबदारी या मूलभूत नैतिक मूल्यांची पायमल्ली आहे.