समाजाच्या उत्क्रांतीसाठी केवळ वैज्ञानिक प्रगती पुरेशी नसते, तर नैतिक अधिष्ठानदेखील तितकंच महत्त्वाचं असतं. महात्मा गांधी, गौतम बुद्ध आणि स्वामी विवेकानंद हे नैतिकतेची शाश्वत शिदोरी आहेत. महात्मा गांधींनी सत्य, अहिंसा आणि आत्मशुद्धीवर आधारित सार्वजनिक जीवनाचं मार्गदर्शन केलं. गौतम बुद्धांनी करुणा, मध्यम मार्ग आणि आत्मप्रकाशाच्या तत्त्वांची शिकवण दिली. तर स्वामी विवेकानंदांनी भारतीय तरुणांना आत्मविश्वास, सेवा आणि राष्ट्रनिष्ठेची जाणीव करून दिली.