Indian Temple Architecture: भारतीय उपखंडातील स्थापत्यकलेचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. परंतु या परंपरेत सर्वाधिक उठून दिसणारा आणि आजही जिवंत असलेला भाग म्हणजे भारतीय मंदिर स्थापत्यकला. विविध धर्म, पंथ, आणि राजवटींनी घडवलेली ही वास्तुकला केवळ भक्तीचा नव्हे, तर कलाचातुर्य, विज्ञान आणि सामाजिक जीवनाचा आरसा आहे.
मंदिर केवळ उपासनेचे ठिकाण नाही तर ती शिक्षण, नाटक, नृत्य, संगीत आणि सामाजिक संवादाची केंद्रे होती. गावाच्या मध्यभागी वसलेले मंदिर म्हणजे त्या समाजाचा ‘आत्मा’ असे. शाळा, सभासद, नृत्यशाळा, ग्रंथालय अशी अनेक रूपे त्यांनी धारण केली. ती स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारी केंद्रे होती.
गुप्तकालीन मंदिरांपासून ते चोळकालीन भव्य मंदिरांपर्यंत स्थापत्यकलेचा उत्कर्ष झाला. परंतु मध्ययुगात झालेल्या मुस्लिम आक्रमणांमुळे उत्तर भारतात अनेक मंदिरे उद्ध्वस्त झाली. तरीही दक्षिण भारतात ही परंपरा टिकून राहिली.