

Challenges Faced in Maintaining Neutrality
E sakal
Key Elements That Shape an Unbiased Administrator
लेखक : अभिजित मोदे
नागरी सेवा ही लोकशाही व्यवस्थेचा कणा आहे. शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी आणि जनतेला सेवा पुरविण्याची जबाबदारी हिच्यावर असते. या प्रक्रियेत निष्पक्षता अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.
निष्पक्ष अधिकारी कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा राजकीय फरक न पाहता सर्व नागरिकांशी समानतेने वागतो. तो आपले निर्णय फक्त कायद्याच्या चौकटीत आणि तथ्यांवर आधारित घेतो.
निवडणुकीदरम्यान जिल्हाधिकारी म्हणून काम करणारा अधिकारी जर कोणत्याही पक्षाच्या प्रभावाखाली न येता सर्व उमेदवारांना समान संधी देत असेल, तर ते त्याच्या निष्पक्षतेचे उत्तम उदाहरण ठरते.