

India EU free trade agreement 2026 impact
esakal
लेखक : महेश शिंदे
जागतिक अर्थकारणाच्या पटलावर गेल्या आठवड्यात एक अशी घटना घडली, जिचे पडसाद पुढील अनेक दशके उमटत राहणार आहेत. भारत आणि २७ देशांचा समूह असलेला युरोपीय महासंघ यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेला मुक्त व्यापार करार अखेर मार्गी लागला आहे.
या कराराची व्याप्ती आणि महत्त्व अधोरेखित करताना केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेन यांनी याचा उल्लेख ‘मदर ऑफ ऑल डील्स’ अर्थात 'सर्व करारांची जननी' असा केला आहे. राजकीय वर्तुळात सहसा अशी भरभक्कम विशेषणे वापरली जात नाहीत, परंतु या कराराचे स्वरूप पाहता हे विशेषण यथार्थ वाटते.