Premium|Study Room : भारतात पहिली एलएनजी ट्रेन सुरू झाली, डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने मोठे पाऊल!

How LNG Powered Trains Work in India : २७ सप्टेंबर २०२६ रोजी गुजरातमधील साबरमती स्थानकावर देशातील पहिल्या एलएनजीवर चालणाऱ्या रेल्वेगाडीचा शुभारंभ झाला. डिझेलवरील अवलंबित्व, इंधनखर्च आणि प्रदूषण कमी करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे.
How LNG Powered Trains Work in India

How LNG Powered Trains Work in India

esakal

Updated on: 

२७ सप्टेंबर २०२६ हा भारतीय रेल्वेसाठी महत्त्वाचा दिवस ठरला आहे. गुजरातमधील साबरमती रेल्वे स्थानकावरून देशातील पहिल्या एलएनजीवर चालणाऱ्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या हस्ते या ट्रेनचा शुभारंभ झाला. ही ८-कोचची नॉन-एसी डीईएमयू ट्रेन होती. पहिल्या प्रवासात तिने साबरमती ते महेसाणा जंक्शन हा मार्ग पार केला. ही ट्रेन म्हणजे भारताने डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.

ट्रेनमध्ये एलएनजीचा वापर कसा केला जातो?

या विषया संदर्भात सगळ्यात आधी प्रश्न पडतो तो म्हणजे एलएनजी-चालित ट्रेन म्हणजे नेमकं काय? एलएनजी म्हणजे लिक्विफाइड नॅचरल गॅस, म्हणजेच नैसर्गिक वायू. हा वायू तब्बल मायनस १६२ अंश सेल्सिअस तापमानाला द्रवरूपात आणला जातो.

आता हा एलएनजी ट्रेनमध्ये कसा वापरला जातो? यासाठी डिझेल इंजिनमध्ये आवश्यक बदल करून त्याला एलएनजी आणि डिझेल अशा दोन्ही इंधनांवर चालणारे ड्युअल-फ्युएल इंजिन बनवले जाते. इंजिनाची मूळ कार्यपद्धती मोठ्या प्रमाणात न बदलता त्यामध्ये अतिरिक्त गॅस-इंजेक्शन सिस्टीम आणि एलएनजी साठवण्यासाठी टाकी जोडली जाते. याचा फायदा असा की, इंजिनाची क्षमता कायम ठेवत इंधनाचा खर्च आणि प्रदूषण कमी करता येते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com