

India GDP Growth 7.8%
esakal
लेखक - श्रीकांत जाधव
नुकतेच भारताच्या पहिल्या तिमाहीचे (Q1 FY26-27) जीडीपी आकडे जाहीर झाले आहेत. यामध्ये भारताचा आर्थिक विकास दर ७.८ टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे. या आकडेवारीनुसार, भारत अजूनही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. मात्र, ही आकडेवारी जाहीर होताच देशात एका मोठ्या आर्थिक आणि राजकीय वादाला तोंड फुटले आहे. विरोधक आणि अनेक नामांकित अर्थतज्ज्ञांनी (ज्यामध्ये माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन, अशोक मोदी यांचा समावेश आहे) असा दावा केला आहे की, सरकारने ही आकडेवारी जाणीवपूर्वक फुगवून सांगितली आहे. मूळ पायाभूत वर्ष (Base Year) बदलणे, डबल डिफ्लेशन पद्धत, आणि 'डिस्क्रिपन्सी' नावाच्या सांख्यिकीय साधनाचा वापर करून जीडीपी वास्तवापेक्षा जास्त दाखवला जात असल्याचा आरोप होत आहे.