

Global Geopolitics 2026
esakal
लेखक : महेश शिंदे
आजचे जागतिक राजकारण अस्थिरतेच्या आणि अनिश्चिततेच्या टप्प्यावर उभे आहे. अमेरिका–चीन सामरिक स्पर्धा, रशिया–युक्रेन संघर्षाचे दूरगामी परिणाम, पश्चिम आशियातील तणाव, तंत्रज्ञान-युद्ध, पुरवठा साखळ्यांची पुनर्रचना आणि हवामान बदलाची तीव्रता या सर्व घटनांनी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे स्वरूप बदलून टाकले आहे. शीतयुद्धानंतर उदयास आलेल्या एकध्रुवीय जगाचे स्थान आता बहुध्रुवीय, स्पर्धात्मक आणि कधीकधी संघर्षप्रधान व्यवस्थेने घेतले आहे. अशा काळात केवळ शक्ती-संतुलनाच्या राजकारणावर आधारित दृष्टिकोन पुरेसा ठरत नाही. जगाला नव्या नैतिक आणि तत्त्वाधिष्ठित मार्गदर्शनाची गरज आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही भारतीय परंपरेतील संकल्पना केवळ नैतिक घोषवाक्य राहात नाही; तर ती आजच्या अस्थिर जगात शाश्वत, समावेशक आणि विश्वासाधारित जागतिक नेतृत्वाची दिशा देणारी विचारधारा ठरू शकते.