

Urbanization challenges in India 2026
sakal
लेखक - सत्यजीत हिंगे
भारताच्या विकासप्रवासात नागरीकरण ही केवळ लोकसंख्येची भौगोलिक हालचाल नसून ती एक सखोल सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक प्रक्रिया आहे. ग्रामीण भागातून शहरांकडे होणारे स्थलांतर, औद्योगिकीकरणाचा वेग, सेवा क्षेत्राचा विस्तार आणि आकांक्षांचे शहरीकरण या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून आधुनिक भारताचा नागरी चेहरा घडत आहे. मात्र, हे नागरीकरण जितके संधी निर्माण करणारे आहे, तितकेच ते गंभीर आव्हानांचे केंद्रही बनत आहे.
आज भारतातील सुमारे ३६ टक्के लोकसंख्या शहरी भागात वास्तव्यास आहे आणि २०३५ पर्यंत हा आकडा ४० टक्क्यांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. शहरांनी आर्थिक विकासाचे इंजिन म्हणून काम केले असून देशाच्या जीडीपीपैकी सुमारे ६५ टक्के योगदान शहरी अर्थव्यवस्थेचे आहे. तथापि, हा आर्थिक लाभ सामाजिक समतेत रूपांतरित होतो आहे का, हा मूलभूत प्रश्न आहे.