

India COP 33 Withdrawal
esakal
‘भारताची COP 33 यजमानपदावरून अचानक माघार’ भारताने २०२८ मध्ये होणाऱ्या युएनएफसीसीसी (UNFCCC) च्या ३३ व्या बैठकीचे (COP 33) यजमानपद भूषवण्याचा आपला प्रस्ताव मागे घेतला आहे. २०२३ साली दुबईमध्ये झालेल्या २८व्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२८ साली परत आशिया-पॅसिफिकची पाळी असलेली ३३वी बैठक भारतात आयोजित करण्याचा मनसुबा व्यक्त केलेला होता.
त्याच वेळी दक्षिण कोरियाने आपणही ही बैठक आयोजित करण्यासाठी उत्सुक असल्याचे संकेत दिले होते. हे यजमानपद भारताकडेच येईल, असा अंदाज होता; पण आता भारताने माघार घेतल्याने बहुदा ही बैठक दक्षिण कोरियात होईल. यापूर्वी २००२ मध्ये भारताने (नवी दिल्ली) ‘COP 8’ चे आयोजन केले होते, ज्यात सुमारे ५,५०० सहभागी आले होते.