

Indian Railways Economy
esakal
भारतीय रेल्वे ही केवळ प्रवासी वाहतूक व्यवस्था नाही; ती देशाच्या अर्थव्यवस्थेची वाहिनी आहे. सुमारे पासष्ट हजार किलोमीटरचे मार्गजाळे, विविध प्रदेशांना जोडणारी वाहतूक क्षमता आणि उद्योग-व्यापाराला आधार देणारी मालवाहतूक या तिन्ही पातळ्यांवर रेल्वेचे धोरणात्मक महत्त्व मोठे आहे. २०२३-२४ मध्ये रेल्वेने सुमारे एक हजार पाचशे एक्याण्णव दशलक्ष टन माल वाहून नेला. ही आकडेवारी रेल्वेची आर्थिक भूमिका स्पष्ट करते.
मात्र वाढता भार पेलण्यासाठी मार्गक्षमता वाढवणे, मालवाहतूक अधिक कार्यक्षम करणे, आधुनिक माल टर्मिनल्स उभारणे, सिग्नलिंग सुधारणा करणे आणि डबे-देखभाल व्यवस्थेत मोठी गुंतवणूक करणे अपरिहार्य झाले आहे. राष्ट्रीय रेल्वे आराखडा २०३० अंतर्गत प्रस्तावित गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर असल्याने केवळ सरकारी निधीवर संपूर्ण अवलंबून राहून अपेक्षित वेळेत व दर्जाने काम पूर्ण करणे कठीण ठरू शकते. त्यामुळे ‘सार्वजनिक हित जपत खासगी सहभाग’ हा पर्याय अर्थशास्त्रीय दृष्टीने चर्चेत आला आहे.