Premium|Study Room : पश्चिम आशियातील भारतीय समुदायाचे वाढते महत्त्व!

Indian community in West Asia : पश्चिम आशियातील लाखो भारतीय नागरिक आपल्या कौशल्याने त्या देशांच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देत आहेत. त्यांची आर्थिक पाठवणी भारताच्या विदेशी चलन साठ्यासाठी आणि विकासासाठी संजीवनी ठरत असून, दोन्ही प्रदेशांतील सांस्कृतिक व राजनैतिक संबंध अधिक दृढ करत आहे.
Indian community in West Asia

Indian community in West Asia

esakal

Updated on

सुदर्शन कुडचे

पश्चिम आशियातील देशांमध्ये काम करणाऱ्या भारतीय नागरिकांची संख्या मोठी आहे. गेल्या काही दशकांत रोजगार, व्यापार आणि सेवा क्षेत्रातील संधींमुळे भारतातील लाखो लोक या प्रदेशात गेले. कालांतराने त्यांनी स्थानिक अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत भारताशी आर्थिक आणि सामाजिक संबंध टिकवून ठेवले. पश्चिम आशियातील भारतीय समुदायाचे योगदान आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक पातळीवर महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे या समुदायाचा अभ्यास भारताची अर्थव्यवस्था आणि परराष्ट्र संबंध या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो.

पश्चिम आशियातील भारतीय स्थलांतराचा इतिहास

भारतीय नागरिकांचे पश्चिम आशियातील स्थलांतर नवे नाही. ऐतिहासिक काळापासून भारत आणि अरब प्रदेश यांच्यात व्यापार संबंध होते. आधुनिक काळात विशेषतः विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात तेल उद्योगाच्या वाढीनंतर भारतीय कामगार आणि व्यावसायिक मोठ्या संख्येने या प्रदेशात गेले. बांधकाम, सेवा, आरोग्य आणि व्यापार या क्षेत्रांत भारतीयांनी काम करण्यास सुरुवात केली. या ठिकाणी केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि उत्तर भारतातील अनेक भागांतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com