

Coastal Geography India
esakal
लेखक : सागर रेपाळे
भारताची किनारपट्टी जवळपास ५०% ने वाढल्याचे अलीकडे आढळले आहे. मात्र ही वाढ नवीन भूभाग मिळाल्यामुळे नसून अधिक अचूक मोजमापामुळे झाली आहे. तसेच समुद्रातील ऑफशोअर बेटांची संख्या देखील पुनर्मोजणीमुळे थोडी वाढली आहे. या बदलांना प्रशासनिक आणि धोरणात्मक महत्त्व आहे, परंतु प्रत्यक्ष भूभागात कोणताही बदल झालेला नाही.
अ) भारताची किनारपट्टी पूर्वी ७,५१६ किमी मानली जात होती; ती आता ११,०९८ किमी इतकी मोजली गेली आहे.
ब) म्हणजेच ३,५८२ किमी (सुमारे ४८%) वाढ झाली आहे.
क) ही वाढ नवीन प्रदेश जोडल्यामुळे नसून सुधारित मापन तंत्रज्ञानामुळे झाली आहे.