
संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीने (UNFPA) प्रसिद्ध केलेल्या ''State of World Population 2024'' या वार्षिक अहवालात भारताच्या लोकसंख्येविषयी महत्त्वपूर्ण निरीक्षणे मांडली आहेत. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून भारताने चीनला मागे टाकले आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक, आर्थिक आणि धोरणात्मक स्तरांवर नव्या दिशेने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
देशातील TFR १९९० मध्ये ३.४ होता. २०२४ मध्ये १.९ या पातळीवर आला आहे. ही घट काही सामाजिक प्रगतीचे सूचक आहे – विशेषतः महिलांचे शिक्षण, विवाहाचे वाढलेले वय, रोजगाराच्या संधी आणि आरोग्यसेवांमध्ये सुधारणा. तथापि नियोजना अभावी हीच घसरण भविष्यातील कामगारशक्तीच्या संकुचनाचे कारण बनू शकते.