

Ananya Rao white collar terrorism case study
esakal
अनन्या राव या एक आयपीएस अधिकारी म्हणून पोलीस उपायुक्त (सायबर आणि अंतर्गत सुरक्षा) पदावर कार्यरत आहेत. त्यांना गुप्तवार्ता विभागाकडून मिळालेली माहिती सांगते की, सुशिक्षित तरुणांमध्ये पांढरपेशा दहशतवादाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. नुकत्याच घडलेल्या घटनांमध्ये काही अभियांत्रिकी पदवीधरांनी बंदी घालण्यात आलेल्या अतिरेकी संघटनेसाठी एन्क्रिप्टेड संवाद साधने विकसित केली आहेत, एका अर्थतज्ज्ञाने परदेशी दहशतवादी गटांना क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून पैसे पाठवले आहेत आणि काही विद्यापीठीय युवकांनी ''बौद्धिक चर्चेच्या'' नावाखाली दहशतवादी विचारसरणीविषयक साहित्य प्रसारित केले आहे.