

लेखक : विपुल वाघमोडे
या घटनेला बरोबर शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत! ९ ऑगस्ट १९२५ रोजी लखनौजवळील काकोरी या छोट्याशा स्थानकावर 'काकोरी कट' घडला. हिंदूस्तान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) या क्रांतिकारी संघटनेने केलेल्या या धाडसी कारवाईने भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाला एक नवा आत्मविश्वास दिला. ही कारवाई केवळ ‘पैशांसाठी’ नव्हती, तर क्रांतीचा संदेश जगभर पोहोचवण्यासाठी केली गेली होती.