
Dravidian Civilization vs Vedic Tradition: Lessons from Keeladi Excavation
लेखक : विपुल वाघमोडे
तमिळनाडूमधील शिवगंगा जिल्ह्यात असलेल्या केईलाडी (Keeladi) या गावी चालू असलेल्या पुरातात्विक उत्खननामुळे प्राचीन द्रविड संस्कृतीचे नवे पैलू समोर येत आहेत. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (ASI) आणि तामिळनाडू पुरातत्त्व विभागाने संयुक्तपणे सुरू केलेल्या या उत्खननाने, संगम युग (३०० BCE ते ३०० CE) हे केवळ साहित्यिक नव्हे, तर एक भक्कम नागरी संस्कृती असलेले युग होते, हे सिद्ध करण्यास हातभार लावला आहे. केईलाडीचे उत्खनन २०१४ साली सुरू झाले आणि आजवर ९ टप्पे पार पडले आहेत.