Ladakh Unrest
E sakal
Study Room
Premium| Study Room:लडाख : राज्यत्वाच्या मागणीवरून उसळलेली अस्वस्थता
Ladakh protest : सोनम वांगचूक यांच्या अटकेमुळे लडाख आणि तेथील आंदोलन एकदम चर्चेत आलं. पण नेमकं हे आंदोलन आहे काय आणि कशासाठी?
Ladakh’s Protest for Representation: Balancing Local Rights and National Security
लेखक : सत्यजित हिंगे
लडाखच्या शांत आणि दुर्गम भूमीत गेल्या आठवड्यात उसळलेला आंदोलनाचा ज्वालामुखी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेत आहे. लेह येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान पोलिस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या चकमकींमध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून, अनेक लोक जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासनाला कर्फ्यू लागू करावा लागला असून इंटरनेट सेवाही काही ठिकाणी बंद करण्यात आली आहे.